
पुणे पोलिस आयुक्त उतरले थेट रस्त्यावर, गणेश मंडळांना भेटी अन् सूचना…
पुणे: पुणे शहरातील गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था तसेच पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुण्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी थेट मैदानावर उतरले आहेत. पुण्यात सध्या गाजत असलेल्या ‘डीजेबंदी’च्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तयारीची पाहणी केली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अमितेश कुमार यांनी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
पुण्यातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. पुण्यातील मानाचे गणपती, साजरे केले जाणारे समाज प्रबोधनात्मक देखावे, विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी राज्यभरातून पुणे शहरात भाविक येत असतात. उत्सवाच्या दृष्टीने तयारी करताना प्रशासनाचा कस लागतो. शासनाच्या संयुक्त पाहणी दौऱ्याची सुरुवात पुण्याचा पहिला मानाचा गणपती असलेल्या ‘कसबा गणपती’ मंदिरापासून झाली. या दौऱ्यात पोलिस आयुक्त आणि पालिका आयुक्तांव्यतिरिक्त पुण्यातील विविध झोनचे पोलिस उपायुक्त (DCP), पालिका अधिकारी तसेच पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी कसबा गणपतीसह मध्यवर्ती भागातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
View this post on Instagram
डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांवरून सध्या शहरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले. मिरवणूक मार्ग, खड्डेमुक्ती, वीज पुरवठा आणि रस्त्यांवरील अडथळे दूर करण्याबाबत पालिका प्रशासनाने आढावा घेतला. त्याचबरोबर विसर्जन मिरवणूक आणि उत्सवाच्या दिवसांत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलिस बंदोबस्त, ‘दामिनी पथक’ आणि सीसीटीव्ही निगराणी तैनात करण्याबाबत चर्चा झाली. गर्दीच्या काळात आपत्कालीन वैद्यकीय मदत आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मेट्रो व इतर वाहतूक यंत्रणांशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.
सण-उत्सव शांततेत आणि शिस्तीत पार पडावेत यासाठी पोलिस आणि पालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत असतानाच, भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी दिले.
मोठी बातमी! संतोष पंडित यांची रवानगी होणार कारागृहात…
पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…
पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…
पुणे शहरात गांजा पिणाऱ्यांनी पोलिसाचा चिरला कोयत्याने गळा..
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

