
पुणे शहरात गांजा पिणाऱ्यांनी पोलिसाचा चिरला कोयत्याने गळा..
पुणे : पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने एका पोलिस शिपायाचा कोयत्याने गळा चिरल्याचा प्रकार घडला आहे. अक्षय बांबल असे हल्ला झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील रेल्वे स्थानकाच्या परिसरात हा प्रकार घडला. पोलिस शिपाई अक्षय बांबल हे रेल्वे स्थानकाच्या परिसरात ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांना काहीजण गांजा पिताना दिसले. पोलिस शिपाई अक्षय बांबल त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी या टोळक्याला हटकले. तेव्हा गांजाच्या नशेत असलेल्या टोळक्याने अक्षय बांबल यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या टोळक्याने धारदार कोयत्याने अक्षय बांबल यांचा गळा चिरला. यामध्ये अक्षय बांबल हे गंभीर जखमी झाले आहेत. या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यावरच थेट जीवघेणा हल्ला झाल्याने शहरातील गुंडांना पोलिसांचे आणि कायद्याचे भय उरले आहे की नाही, असा सवाल विचारला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात पोलिसावर हल्ला; डोक्यात दगड घालून आरोपी फरार…
पुणे शहरात टोळीला पकडायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला…
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला…
पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…

