पुणे जिल्ह्यात युवकाला पत्नी अन् मुलासमोरच संपवल्याचं कारण आलं पुढे; प्रेमसंबंध…

पुणे: पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा-वीर रस्त्यावर एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. चारित्र्याच्या संशयावरून घडलेल्या या थरारक हत्येचा संपूर्ण प्रकार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमर पवार (वय २५) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी दीपक मनोहर पाल (मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

मृत अमर पवार हा आरोपी दीपक पाल याच्या पत्नीसोबत आणि तिच्या चिमुकल्या मुलीसोबत रस्त्याने चालत जात होता. आरोपी दीपक याला आपल्या पत्नीचे अमर पवार याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून आणि रागाच्या भरात दीपक मागून आला आणि महेश धाडवे यांच्या घराच्या गेटसमोर त्याने अमरवर अचानक हल्ला चढवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

हल्ल्यादरम्यान अमरची भयभीत झालेली महिला (आरोपीची पत्नी) त्याला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती, मात्र आरोपीच्या क्रूरतेपुढे तिचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्याच वेळी तिथून जाणारा एक दुचाकीस्वारही या प्रकारामुळे प्रचंड भयभीत झाला आणि नुसताच पाहत राहिला. दीपकने अमरच्या गळ्यावर चाकूने इतके प्राणघातक वार केले की अमर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हत्येनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी दीपक पालचा पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांच्या मदतीने शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी मृत अमरचा चुलत भाऊ अमित जगन्नाथ पवार याच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी आरोपी दीपक पाल याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि आर्म्स ॲक्टच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेचा पुढील सखोल तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात युवकाची सपासप वार करून निर्घृण हत्या; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद…

शिल्पा गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; मोठा खुलासा समोर…

पुणे! व्हॉट्सऍप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

पुणे! युवतीची अनैतिक संबंध अन् आर्थिक वादातून हत्या; पोलिसांनी लावला छडा…

पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!