
मुंबईत पोलिसाने युवतीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; पोलिसांनी वस्तुस्थिती आणली समोर…
मुंबईः कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईतल्या दादरमधील आंदोलनादरम्यान सिव्हिल ड्रेसमध्ये आंदोलन सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसाने आक्षेपार्ह पद्धतीने युवतीला पकडल्याचा दावा केला जात होता. पोलिसाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी व्हिडीओची अत्यंत बारकाईने परीक्षण करून वस्तुस्थितीची खात्री केली आहे.
मुंबईतील एका विद्यार्थिनीच्या आंदोलनादरम्यानचा हा प्रकार असून एका युवतीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुंबईतील एका आंदोलनादरम्यान साध्या वेशात असलेल्या पोलिस हवालदार दीपक बल्लाळ यांनी विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर विरोधकांनी संताप व्यक्त केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महोदय, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली.
एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे… https://t.co/sC76sMbKEW
— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) July 24, 2026
मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, आमदार रोहित पवार, सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकारावर सवाल उपस्थित करत तीव्र आक्षेप नोंदवलेत. ही व्यक्ती पोलिस असेल तर अशा पद्धतीने कारवाई करू शकते का? तात्काळ त्याचं निलंबन करावं अशी मागणी एक पोस्टच्या माध्यमातून केली जात आहे. याचदरम्यान आता संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची माहिती समोर आली आहे. सदर पोलिस कर्मचारी शिवाजी पार्क पोलिस स्थानकांत कार्यरत असून दीपक बल्लाळ असे त्यांचे नाव आहे. तसेच दीपक बल्लाळ यांच्या संदर्भातील व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे म्हणत पोलिस विभागाने आरोप फेटाळून लावले आहेत.
View this post on Instagram
दीपक बल्लाळ हे पोलिस हवालदार म्हणून शिवाजी पार्क येथे कार्यरत आहे. आंदोलन संपल्यानंतर निळ्या रेनकोर्टमधील तरुण पुन्हा मुलांना आंदोलनासाठी उचकवत होता असा पोलिसांनी दावा केला आहे. त्यावेळी बल्लाळ हे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असताना, त्याची सोबत असलेली युवती अटकाव करण्यासाठी मध्ये गेली असे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले. व्हिडीओमध्ये दीपक बल्लाळ यांनी मुलाच्या कॉलरला पकडल्यानंतर तरुणीमध्ये येऊन अटकाव करू लागल्याचा पोलिसांचा दावा केला आहे. संदर्भातील व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. संबंधित अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी अधिकारी दुसऱ्या दिशेला पाहत असताना एक महिला अचानक मध्ये आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेची पडताळणी केली असून, व्हिडीओचे अत्यंत बारकाईने परीक्षण करून वस्तुस्थितीची खात्री केली आहे, असे मुंबई पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसकाका वाटतात तितके वाईट नव्हते निलंबित करू नका; युवकाने सांगितली इनसाईड स्टोरी…
दिल्लीत महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई…
दिल्ली पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन; Video Viral…
पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओवरून बसवून काढली आरोपींची धिंड…
महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…
पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…

