पोलिसकाका वाटतात तितके वाईट नव्हते निलंबित करू नका; युवकाने सांगितली इनसाईड स्टोरी…

मुंबई: “खिशात ५० ग्रॅम पावडर टाकून कारवाई करेन” अशी धमकी देणाऱ्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या पोलिस कर्मचाऱ्यावरती कारवाई देखील करण्यात आली. त्याच पोलिसांच्या गाडीत बसलेल्या तीन युवकांपैकी एका युवकाने पुढे येत या घटनेची ‘दुसरी बाजू’ समोर आणली आहे. “ते पोलिस काका वाटतात तितके वाईट नव्हते, त्यामुळे त्यांना जास्त काळासाठी निलंबित (सस्पेंड) करू नका,” अशी विनंती या युवकाने मुंबई पोलिस प्रशासनाला केली आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला या युवकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे विशेष आभार मानले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी हस्तक्षेप करत पोलिसांशी चर्चा केली व विद्यार्थ्यांना सोडवून आणले. मनसेच्या या मध्यस्थीबद्दल तरुणाने त्यांचे मनापासून धन्यवाद मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

राज ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत पोलिसांच्या गाडीतील त्या व्हिडीओचा संदर्भ देत पोलिसांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना युवकाने सांगितले की, ‘प्रत्येक गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट नसते. मी स्वतः त्या गाडीत उपस्थित होतो. सुरुवातीला जरी पोलिसांची भाषा किंवा परिस्थिती थोडी कडक वाटली, तरी नंतर त्या पोलिस कर्मचाऱ्याने आमच्याशी अतिशय चांगला आणि मित्रत्वाचा व्यवहार केला. गाडीत उकाडा आणि उष्णता जाणवू लागल्याने आम्ही जेव्हा एसी (A/C) लावायला सांगितला, तेव्हा त्यांनी लगेच एसी सुरू केला. एवढेच नाही तर प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून त्यांनी गाडीत गाणी ऐकण्याचे स्वातंत्र्य दिले आणि आम्ही सर्वांनी एकत्र गाणी ऐकली. विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर पोलिसांनी सहकार्याची भूमिका घेतली.’

मुंबई पोलिस प्रशासनाला एक नम्र अपील करताना म्हणाला, “त्या पोलिस अधिकाऱ्याला जास्त दिवसांसाठी निलंबित करू नका. लवकरच मुंबईत गणेशोत्सव सुरू होत आहे आणि या सणाच्या काळात शहरात प्रचंड गर्दी असते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पोलिस नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठी मदत करतात. त्यामुळे त्या पोलिसांवर जास्त मोठी कारवाई करू नये.” सोशल मीडियावर एकांगी व्हिडीओ पाहून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, थेट गाडीत असलेल्या या प्रत्यक्षदर्शी तरुणाच्या स्पष्टीकरणामुळे आता या प्रकरणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Omkar Parab (@__t0xic)

“एक कालपासून ना व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय आणि या व्हिडीओमध्ये जो मुलगा आहे… ज्या गाडीत आहे… पाठीला जो मुलगा आहे, तो मीच आहे. आणि मला या विषयावरती काहीतरी बोलायचं होतं, म्हणून मी आता व्हिडीओ बनवतोय. फर्स्ट ऑफ ऑल, राज साहेब, उद्धव साहेब, अमित दादा, आदित्य दादा… थँक्स अ लॉट! तुम्ही त्या प्रोटेस्टरांना तुमच्या घरासमोर प्रोटेस्ट करायची जी परवानगी दिलात त्याबद्दल. आणि राज साहेब, तुम्ही तो विषय प्रेसमध्ये मांडलात… तो प्रचंड व्हायरल झाला, त्यासाठी पण थँक्स! त्यानंतर पोलिसांवरती जी कारवाई झाली, ती बरोबर झाली. झाली पण पाहिजे. आता पोलिसांमध्ये पण एक शिस्त असेन… कसं… पण आतापर्यंत हे ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायचीय की, प्रत्येक गोष्ट अशी ब्लॅक अँड व्हाईट नसते. मला असं सांगायचंय की मी त्या गाडीत होतो. ते काका मनाने खूप चांगले होते. आम्ही त्यांना बोललो की, ‘काका, गाडीत गरम होतंय, तुम्ही एसी लावा’, तर त्यांनी एसी सुद्धा लावली.

आम्हाला बोर होत होतं, म्हणून त्यांनी गाणी वाजवली… त्यांनी गाणी सुद्धा प्ले केली. आणि शेवटी त्यांनी सोडल्यानंतर पण आम्हाला हेच बोलले की, ‘ते बघा तुमचे प्रोटेस्टर तिथे प्रोटेस्ट करतायत, जाऊन त्यांना जॉईन करा.’ तर मला मुंबई पोलिसला हेच सांगायचंय की, त्यांना जास्त टायमासाठी सस्पेंड करू नका. कारण आता मुंबईत गणपतींचा आगमन होणार आहे, तेव्हा खूप गर्दी होते आणि सगळ्यांनाच माहिती आहे मुंबई पोलिसची किती हेल्प होते आपल्या सगळ्यांना त्या टायमिंगला. तर तेव्हा त्यांची गरजसुद्धा लागेल. हाच माझा मेसेज आहे मुंबई पोलिससाठी.”

दिल्लीत महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई…

दिल्ली पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन; Video Viral…

पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओवरून बसवून काढली आरोपींची धिंड…

महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…

पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!