सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; लाखो रुपयांचा गांजा जप्त…

सोलापूर : पंढरपूर येथील आषाढी वारीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अंमली पदार्थाची व अवैध दारु विक्री करणा-या आरोपींचा शोध घेवुन त्यांच्यावर कडक कारवाई करणेबाबत गुन्हे आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, यांना सुचना दिल्या होत्या.

सदर सुचना प्रमाणे पोनि / संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधीकारी व पथकला कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. दि. 16/07/2026 रोजी सपोनि / भिमगोंडा पाटील व त्यांचे पथक मोहोळ पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलिस हवालदार/ विजयकुमार भरले यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, भैरवनाथ भोसले (रा. अंकोली ता. मोहोळ) याने त्याचे शेतातील जनावरचे गोठ्यात अवैध गांजा साठा ठेवला आहे. सदरची माहिती संजय जगताप, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना दिली. पोनि / जगताप यांनी सदरची माहिती मोहोळ पोलिस ठाणेकडील पोलिस निरीक्षक दिपक पाटील व त्यांचे स्टाफसह जाऊन पुढील कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे सपोनि / पाटील यांनी श्री. दिपक पाटील पोलिस निरीक्षक यांना प्राप्त गोपनिय बातमी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोनि / दिपक पाटील यांनी प्राप्त गोपनिय बातमी प्रमाणे भैरवनाथ भोसले (रा. अंकोली ता. मोहोळ) याच्या शेतातील जनावर गोठयात छापाकारवाई केली असता सदर गोठयामध्ये 2 प्लास्टीकचे पोते भरलेल्या आवस्थेत मिळून आले. सदर प्लॉस्टीक पोते बाबत भैरवनाथ भोसले याच्याकडे विचारपुस करता तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला. सदरचे प्लास्टीक पोते तपासले असता त्यामध्ये उग्र वास असलेला ओलसर हिरव्या रंगाचा, पाने, बिया, बोंड आलेला मादक पदार्थ असलेला असा एकुण 20, 19, 250/- रुपये किंमतीचा 40 किलो 385 ग्रॅम वजनाचा मादक पदार्थ गांजा मिळुन आला. सदरचा गांजा पोलिसांनी जप्त केला.
भैरवनाथ भोसले (रा. अंकोली ता. मोहोळ) याचे विरुध्द गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिमय १९८५ चे कलम 8 (c), 22 (b), (ii), (c) अन्वये मोहोळ पोलिस ठाणे गु. र. नं :- 699/26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलिस ठाणे हे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधीकारी सोलापूर, सुरज जगताप, पोलिस निरीक्षक, संजय जगताप स्था. गु. शाखा, पोलिस निरीक्षक / दिपक पाटील नेम. मोहोळ पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / भिमगोंडा पाटील, पोलिस
हवालदार / सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, मपोहेकॉ आश्वीनी गोटे, पोकों/ सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, चापोकों/ दिलीप थोरात तसेच मोहोळ पोलिस ठाणे कडील सपोनि / नितीन अतकरे, पोउपनि / नवनाथ पाटील व पोलिस स्टाफ यांनी बाजवली आहे.

सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांसह संपवलं; कारण आलं समोर…

सोलापूर हादरलं! दिराने मधरात्री घरात घुसून वहिनीसह 2 पुतण्यांना तलवारीनं भोसकलं…

सोलापूर! लग्नानंतर दोनच महिन्यात समजलं पत्नीचं प्रेम प्रकरण अन्…

सोलापूर! प्रसिद्ध उद्योजकाने १७व्या मजल्यावर जात हात जोडत डोळे मिटले अन्…

सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!