पुणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! धनादेश अनादर प्रकरणात व्याजासह रक्कम अदा करण्याचे आदेश…

पुणे : पुणे येथील ९वे संयुक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालयाने धनादेश अनादर (Cheque Dishonour) प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय देत प्रतिवादींना ₹10,23,713 ही रक्कम एका महिन्याच्या आत अदा करण्याचे, तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून प्रत्यक्ष वसुली होईपर्यंत वार्षिक १० टक्के व्याज देण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष सारांश दावा क्रमांक 401/2021 मध्ये एम/एस इन्फिनिटी एंटरप्रायझेस यांनी एम/एस न्यू टाइम ऑन तसेच तिचे भागीदार आनंद प्रभाकर थोरात, संजय मेटकरी, प्रभाकर थोरात आणि सुदर्शन थिटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. फिर्यादी संस्थेने प्रतिवादींना घड्याळे, सुटे भाग आणि इतर साहित्य पुरविले होते. त्या व्यवहाराच्या मोबदल्यात प्रतिवादींकडून ₹10,23,713 रकमेचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, संबंधित धनादेश बँकेने “Funds Insufficient” या कारणास्तव अनादरित (Dishonoured) केला.

त्यानंतर फिर्यादीने Order XXXVII, Code of Civil Procedure अंतर्गत विशेष सारांश दावा न्यायालयात दाखल केला. फिर्यादीच्या वतीने ऍड. प्रसाद विराज निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले की, प्रतिवादींना समन्स बजावूनही त्यांनी नियमानुसार प्रभावी बचाव उभा केला नाही. एका प्रतिवादीने ‘Leave to Defend’ अर्ज दाखल केला होता; मात्र त्याचा पुढील पाठपुरावा न केल्याने तो अर्ज निकाली काढण्यात आला. न्यायालयाने फिर्यादीने सादर केलेला धनादेश, बँकेचा रिटर्न मेमो आणि इतर संबंधित कागदपत्रांचा विचार करून फिर्यादीचा दावा सिद्ध झाल्याचे मान्य केले.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार…
प्रतिवादींनी ₹10,23,713 ही रक्कम एका महिन्याच्या आत अदा करावी.
दावा दाखल केल्याच्या तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम वसूल होईपर्यंत वार्षिक १० टक्के व्याज अदा करावे.
CPC कलम 34 अंतर्गत १० टक्के व्याज मंजूर करण्यात आले.
फिर्यादीच्या बाजूने खर्चासह डिक्री मंजूर करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणात ऍड. प्रसाद विराज निकम यांना ऍड. मन्सूर तांबोळी आणि ऍड. शुभम बोबडे यांनी सहकार्य केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मोठी बातमी! नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल…

अशोक खरात प्रकरणी नाशिक न्यायालयाचा मोठा निर्णय…

तब्बल 50 वर्षांनी लागला 7.65 रुपयांच्या चोरीचा निकाल; न्यायालयाने दिले आदेश…

पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य…

वैष्णवी हगवणे प्रकरण! आरोपींचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटले की…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!