पुणे शहरात तोतया ‘लेडी सिंघम’चा पर्दाफाश…

पुणे : अंगावर खाकी गणवेश आणि खांद्यावर स्टार लावून सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब दाखवणाऱ्या एका तोतया ‘लेडी सिंघम’ला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने कॅम्प परिसरात शनिवारी (ता. 6) ही कारवाई केली आहे. समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समिनाचे पोलिस दलात भरती होऊन पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते, मात्र ते भंगले होते. सध्या ती एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. लष्कर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे हे आपल्या पथकासह कॅम्प परिसरात शनिवारी (6 जून) गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना एका नामांकित खाजगी क्लिनिकच्या बाहेर एक महिला पोलिसाच्या वर्दीत उभी दिसली. तिच्या खांद्यावर पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे स्टार्स होते. मात्र, तिच्या हालचाली आणि वावर संशयास्पद वाटल्याने PSI महेश शिंदे यांना संशय आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पीएसआय शिंदे यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेची चौकशी केली. “तुम्ही कोणत्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहात? तुमचे ओळखपत्र दाखवा,” असे विचारताच संबंधित महिलेची बोलती बंद झाली. ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, ती तोतया पोलिस असल्याचे निष्पन्न झाले.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी समिना हिला कॅम्प परिसरातील एका नामांकित क्लिनिकमध्ये उपचारासाठी डॉक्टरांची वेळ हवी होती. मात्र, गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे तिला अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यामुळे तिने थेट पोलिसांचा गणवेश परिधान केला आणि क्लिनिकमधील रिसेप्शनिस्ट तसेच इतर लोकांवर आपण पोलिस अधिकारी असल्याचा दबाव टाकून लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी आरोपी समिना इनामदार हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. तिने यापूर्वी अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

तोतया IAS महिला अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे; राजकीय नेत्यांना…

तोतया IAS ने दोन महिला अधिकाऱ्यांना फसवलं…

डिजिटल अरेस्टसाठी तोतया पोलिस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल अन् युवकाची शक्कल…

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!