
मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; कोट्यावधीचं सोनं जप्त, 7 जण अटकेत…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA)संचालनालय महसूल गुप्तचर (DRI) विभागाने सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला.
मुंबई विमानतळावरील कारवाईत सुमारे 3.2 किलो परदेशी सोन्याची धूळ (वॅक्स स्वरूपात) जप्त करण्यात आली असून, त्याची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये आहे. या प्रकरणात 3 बांगलादेशी व श्रीलंकन नागरिक, 3 विमानतळ कर्मचारी आणि 1 रिसिव्हर अशा एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या माहितीनुसार, बँकॉकहून मुंबईमार्गे प्रवास करणारे परदेशी नागरिक शरीरात सोनं लपवून आणत होते. विमानतळावरील काही कर्मचारी हे सोनं बाहेर काढून स्थानिक एजंटांकडे पोहोचवत होते. कारवाईदरम्यान दोन बस चालक आणि एका कोच मॉनिटरला सोन्याची डिलिव्हरी करताना पकडण्यात आले आहे.
दरम्यान, कस्टम्स कायदा, 1962 अंतर्गत सोनं जप्तीची कारवाई करण्यात आली असून संपूर्ण तस्करी साखळी उद्ध्वस्त करण्यात डीआरआयला यश आले आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू असून हे सोनं नेमकं कुठे जाणार होतं, कुठून आलं होतं याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
पुणे विमानतळावर खळबळ! ‘चायनीज फूड’चा डबा उघडताच अधिकारीही थक्क…
पुणे विमानतळावरून भाजपचा पदाधिकारी अटकेत; कारण बॅगेत…
विमानतळावर तपासणी करतानाच परदेशी महिलेच्या अंडरगारमेंटमध्ये…
नागपूरच्या विमानतळावरून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त…
नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; 15 जणांचा जागीच मृत्यू, नोटांसाठी गर्दी…

