
सीआयडीच्या पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या रोखठोक वक्तव्यानंतर बदली रद्द…
मुंबई : सीआयडीच्या पोलिस अधीक्षक वैशाली माने यांची बदली गृह विभागाने रद्द केली आहे. पोलिस दलातील पुरुषप्रधान मानसिकतेवर बोट ठेवल्यानंतर वैशाली माने यांची बदली रद्द करीत सरकारने त्यांना वेटिंगवर ठेवले आहे.
वैशाली माने या सध्या सीआयडीच्या पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. इतर IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवेळी वैशाली माने यांची बदली वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मिरा भाईंदरच्या पोलिस उपायुक्त (DCP) पदी करण्यात आली होती. त्यानंतर महिला सन्मानाचा आणि महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम स्थानाचा मुद्दा वैशाली माने यांनी अधोरेखित करून सरकारला आरसा दाखवला होता.
View this post on Instagram
पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या आरोपानंतर त्यांची बदली रद्द करीत सरकारने त्यांना वेटिंगवर ठेवले आहे. बदलीच्या प्रक्रियेत महिला अधिकाऱ्यांना वारंवार ‘साईड पोस्टिंग’ दिली जाते यावर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पोस्टिंग नको, सन्मान द्या, अशी विनवणी सरकारला करीत मी पोस्टिंगसाठी बोलत नाही पण हा मानसन्मानाचा आणि पक्षपातीपणाचा मुद्दा आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मी कायमस्वरूपी साईड पोस्टिंगला देखील राहू शकते. परंतु, महिला अधिकारी म्हणून अडचणी, भावना आणि अपेक्षांना पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना गांभीर्याने घेतले जावे, अशी विनंती वैशाली माने यांनी सरकारला केली. पोलिस दलातील बदल्यांचे राजकारण, कामाच्या ठिकाणी महिला अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय आणि पोलिस दलातील पुरुषप्रधान मानसिकता यावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
पोलिस अधिकारी वैशाली माने यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे येथे पोलिस अधीक्षक (SP) आणि अमरावती येथे पोलिस उपायुक्त (DCP) (मुख्यालय) या पदांवर काम केले आहे.
पुणे! लग्नासाठी चक्क पोलिस अधिकारी झाल्याचा बनाव! इम्प्रेशनसाठी लावले खोटे फ्लेक्स…
DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…
Video! पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांची विशेष मुलाखत…
Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत…
पोलिस अधिकारी स्वाती साठे दरडावून म्हणाल्या, संजू, तू बातों से मानेगा या लातों से…

