पुणे! पोलिस अधिकारी गणेश तनपुरे यांचे हृदयविकाराने निधन; दोन दिवसांवर आली होती बदली…

पुणे : पुणे शहरातील आंबेगाव पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ASI) गणेश तनपुरे (वय ५३) यांचे रविवारी (ता. ३१) दुपारी २:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पुणे पोलिस दलासह आंबेगाव आणि बिबवेवाडी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रविवारी रात्री १०:०० वाजता गायमुख चौक, आंबेगाव बुद्रुक येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस विभागाच्या वतीने या अधिकाऱ्याला हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि सलामी देऊन अंतिम मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) राहुल आवारे, आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद जिन्हे, सर्व अधिकारी अंमलदार/कर्मचारी विविध पोलिस ठाण्यांमधील त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी, शांतता कमिटीचे सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

गणेश तनपुरे यांची दोन दिवसांवर बदली आली होती आणि ५ वर्षांनी पोलिस दलातून सेवानिवृत्त होणार होते. तनपुरे यांनी आपल्या सेवाकाळात बिबवेवाडी, सहकारनगर यांसह अनेक पोलिस ठाण्यांमधील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. सध्या ते आंबेगाव बुद्रुक पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखेत कार्यरत होते. आंबेगाव पोलिस ठाण्यातील त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, अवघ्या दोन दिवसांतच ते नवीन ठिकाणी रुजू होणार होते. नवीन पोस्टिंगच्या तयारीत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

अत्यंत मितभाषी, कोणाचेही मन न दुखावणारे आणि नेहमी सहकार्याची भूमिका घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. प्रदीर्घ काळ याच भागात नोकरी केल्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि हितचिंतक वर्ग निर्माण झाला होता. त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. गणेश तनपुरे हे मूळचे इंदापूर गावचे रहिवासी होते. मात्र, पोलिस दलातील नोकरी आणि मुलाच्या उच्च शिक्षणासाठी ते सध्या आंबेगाव बुद्रुक येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

पुणे शहरातील पोलिसकाकाचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन…

पोलिस पित्याचं ऑन ड्युटी अन् प्रशिक्षणार्थी मुलाचेही हार्ट अटॅकने निधन…

हृदयद्रावक! पुण्यात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यू; स्वप्न अधुरे अन् वडील…

लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!