
पुणे! युवकाच्या ब्लॅकमेलिंगमुळे युवतीने केली आत्महत्या…
पुणे: पुणे शहरातील बाणेर परिसरात राहणाऱ्या युवतीने (वय १७) युवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी गोरख सुग्रीव गोरे (वय २१, मूळ रा. जालना, सध्या रा. बालेवाडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी गोरख गोरे हा गेल्या काही दिवसांपासून साक्षीला मानसिक त्रास देत होता. साक्षीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो वारंवार देत होता. या ब्लॅकमेलिंगमुळे साक्षी प्रचंड तणावाखाली होती. या धमक्यांना आणि होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटी तिने बाणेर येथील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
साक्षीचा भाऊ दीपक याने दिलेल्या फिर्यादीवरून बाणेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…
पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…
पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…
पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…

