
बीडचे उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तिका प्रकरणात नवा ट्विस्ट…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तिकेच्या नादापायी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आता त्याच कला केंद्राविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलिस स्टेशनच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’ या नावाखाली चालणाऱ्या भयानक सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी १५ मार्चला कला केंद्रावर छापा टाकून 25 युवतींची मुक्तता केली. एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी व अनैतिक व्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तिकेचा देखील या सेक्स रॅकेटमध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील नर्तिकेला अटक केली असून ती सध्या कोठडीत आहे. गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाड हिनी पोलिसांना कबुली दिली. मात्र ती नर्तिका मोडनिंब येथील कला केंद्रात वेश्या व्यवसायात अडकलेली आढळल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कला केंद्र असे फक्त नाव होते मात्र येथे काळे धंदे सुरू असल्याचे समोर आले आहे. येथे पार्ट्या भरवून नर्तिका डान्स करून लोकांना खूश करायच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकडे ढकलण्याचे मोठे रॅकेट चालत होते. कित्येक महिन्यांपासून हे काळे धंदे राजरोस सुरू होते. महत्त्वाचे म्हणजे हे कला केंद्र पोलिस स्थानकापासून जवळच होते. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाईल, रेकॉर्डिंग डिव्हाइसेस जप्त करण्यात आले आहेत. पीडित युवतींना बाहेरून आणून येथे कोंडून ठेवण्यात येत होते. त्यांना नृत्याच्या नावाखाली ग्राहकांसमोर उभे करून अनैतिक कामे करायला भाग पाडले जात होते. एवढंच नाहीतर सर्रासपणे हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचे येथे आयोजन होत होते. उपसरपंच बर्गे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आधीच खळबळ उडाली होती. आता त्याच प्रकरणातील नर्तिका या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली आढळल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मुख्य सूत्रधारांसह आणखी काही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला जामीन; सुनावणीवेळी…
उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…
गोविंद बर्गे अन् पूजा गायकवाड प्रकरणातील व्हॉट्सअप चॅट अन् लॉजची माहिती समोर…
उपसरपंच गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट…
गोविंद बर्गे अन् पूजा गायकवाड प्रकरणातील व्हॉट्सअप चॅट अन् लॉजची माहिती समोर…

