
नाशिक! वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर युवकाने मृत्यूला कवटाळले…
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या शुभम बाळासाहेब व्यापारी (वय २१, रा. सिडको, लक्ष्मीनगर, महाले फार्म ) या युवकाने खांडे मळा परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच व्यापारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंबड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचे वडील बाळासाहेब व्यापारी हे फळव्यवसाय करत होते. पंधरा दिवसांपूर्वी एका अपघातात त्यांचे आकस्मिक निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी दहावा व तेरावा असे धार्मिक विधी पार पाडले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत 15 जानेवारी रोजी मतदानाचा दिवस असल्याने अनेक नातेवाईक आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. याच दरम्यान शुभम घरातून अचानक बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी मित्र, नातेवाईक तसेच संभाव्य ठिकाणी कसून शोधमोहीम राबवली. मात्र, चार दिवस उलटूनही शुभमचा कोणताही तपास लागला नाही. अखेर रविवारी (ता. 19) सकाळच्या सुमारास सिडकोतील खांडे मळा परिसरातील एका विहिरीत मृतदेह तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
नागरिकांनी तत्काळ अंबड पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर नातेवाइकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मृतदेह शुभम व्यापारी याचाच असल्याची खात्री झाल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, शुभमने आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वडिलांच्या निधनानंतर तो मानसिक तणावात होता का, याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे व्यापारी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाने नागरिकही भावुक झाले असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.
नाशिक! रिसॉर्टवर हळदीच्या दिवशीच वधूचा मृत्यू अन् तिथेच आठवडापूर्वी…
नाशिकमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना गंडा…
नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…
नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले…

