
आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणातील कैद्याची जेलच्या शौचालयात आत्महत्या…
परभणी : कारागृहातील बंदिवान कैदी राजू अडकिने याने कारागृहातील शौचालयात शालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत कैदी राजू अडकिने हा त्याच्याच कुटुंबातील आई, मावशी आणि मावशीचा नवरा (काका) या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी होता. बॅरेक क्रमांक एकमधील शौचालयात शालच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच न्यायाधीश, कारागृह अधीक्षक, पोलीस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या या कैद्याचे मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्याचे समोर आले आहे. या अगोदरही त्याने अशाच पद्धतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी त्याचा जीव वाचला होता. परंतु दुसऱ्या वेळी मात्र त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यातील येरवडा कारागृहातच हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात एका आरोपीला मारहाण झाली होती. बराक क्रमांक 1 मध्ये आरोपीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये विशाल कांबळे अस मृत पावलेल्या आरोपीचे नाव आहे.
विशाल कांबळे याच्या डोक्यावर व कंबरेवर फरशीने वार करण्यात आले होते. आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशाल कांबळे याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान विशाल कांबळे याचा मृत्यू झाला आहे.
मोठा आरोप! वाल्मीक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट? स्पेशल चहा, झोपायला…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
बीड! पोलिसांनी घेतली झाडाझडती अन् कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाले…
कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगाचा घेतला चावा…
Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

