
लातूर! पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या…
लातूर : पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औराद शाहजनी या गावात घडली. इम्रान बेलुरे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि वाहन चालक तानाजी टेळे यांच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचे इम्रान बेलुरे याने म्हटले आहे. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान तेरणा नदीकाठच्या झाडीत इम्रानने संबंधितांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करत व्हिडीओ केला. व्हिडीओ बनवल्यानंतर त्याने आत्महत्या केली. सबंधित पोलिस अधिकारी आणि त्याच्या चालकावर कारवाई करावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. इम्रान बेलुरे याच्यावर चोरी आणि घरफोडीचे दोन गुन्हे दाखल असून, पोलिस त्याची चौकशी करत होते.

आत्महत्या करायच्या आधी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये त्या युवकाने पोलिस अधिकारी त्रास देत असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, “मला त्या पीएसआयने त्रास दिला. आता सहन होत नाही. माझ्याकडून चोरीचा गु्न्हा झाला, पण माझी ती चूक झाली. मी तसं करायला नको होतं. त्यानंतर मला आणि माझ्या परिवाराला रात्री-अपरात्री त्रास देण्याचं काम सुरू केलं. आता मला सहन होत नाही. त्यामुळे मी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करतो. याला सर्वस्वी जबाबदार तो पीएसआय आणि त्याचा ड्रायव्हर आहे.”
लातूर! नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडलं अन् पत्नीने उचलले मोठे पाऊल…
लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…
लातूर! फ्रेशर्स पार्टीत डान्स करताना एकमेकांना धक्का लागला अन् जीव गेला…
लातूर! प्रियकरासोबत केला लॉजवर प्लॅन अन् पती दिसताच…
लातूरमध्ये भरदिवसा शिक्षकाची छातीत सुरा खुपसून हत्या…

