
पुणे पोलिस आयुक्तांचे PRO सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन…
पुणे : पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे जनसंपर्क अधिकारी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे पीआरओ सहायक पोलिस फौजदार प्रवीण घाडगे यांना निलंबित केले आहे. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली असून, सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
गोपनीय चौकशीत प्रवीण घाडगे यांनी आपल्या पदाचा; तसेच पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करून एका वादग्रस्त बिल्डरला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित बांधकाम व्यावसायिक अविनाश पवार याचे आंदेकर टोळीशी थेट संबंध असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

अमितेशकुमार म्हणाले, ‘प्रवीण घाडगे यांनी पुणे पोलिस आयुक्तांचे नाव वापरून सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. जमीन वाद प्रकरणात आंदेकर टोळीशी संबंधित असलेला बांधकाम व्यावसायिक अविनाश पवार याला मदत मिळावी, यासाठी हा दबाव टाकण्यात आला होता. मात्र, सहायक आयुक्त खटके यांनी कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार देऊन हा प्रकार पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या निदर्शनास आणून दिला. जमीन वादाशी संबंधित काही पीडित तक्रार दाखल करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात आले होते. मात्र, अविनाश पवारने तक्रार दाखल होऊ नये, यासाठी पीडितांवर विविध प्रकारचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ‘स्टॅनली’ नावाचा व्यक्ती मध्यस्थाची भूमिका बजावत होता. तपासात स्टॅनलीचा थेट संपर्क प्रवीण घाडगे यांच्याशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्टॅनली याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. घाडगे यांनी प्रकरण मिटवण्यासाठी आणि तडजोड घडवून आणण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याची कबुली दिली. आंदेकर टोळीशी संबंधित अविनाश पवार यांचे प्रकरण घेऊन तोच व्यक्ती प्रवीण घाडगे यांच्यापर्यंत पोहोचल्याचेही त्याने मान्य केले आहे.
पोलिस दलात शिस्त आणि प्रमाणिकपणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी त्यांच्या प्राथमिक कर्तव्यात कसूर करील, तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रवीण घाडगेची विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर बडतर्फीबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…
पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…
पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

