
पांढरकवडा येथील १२ यात्रेकरुंची ५ लाख ७२ हजार रुपयाची फसवणूक…
घाटंजी (यवतमाळ): मुंबई येथील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवस्थापकाने पांढरकवडा येथील १२ जणांची ५ लाख ७२ हजार रुपयाने फसवणूक केल्याची लेखी तक्रार पांढरकवडा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक नरेंद्र सदाशिव नार्लावार यांच्यासह १२ जणांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे व त्यांचे पथक करित आहे.
मुंबई येथील वंडरलस्ट एक्सप्लोरर कंपनीच्या व्यवस्थापक कादंबरी महेंद्र देवल, (संचालक, वंडरलस्ट एक्सप्लोरर, रा. ७०२ अ विंग, लक्ष्मी निवास, राम मारोती रोड, मिरा रोड, मुंबई) या जूनमध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री व हरिद्वार अशी चार धाम यात्रा आयोजित केली होती. या यात्रेसाठी त्यांनी प्रत्येकी ४९ हजार भाडे ठरविण्यात आले होते. पांढरकवडा येथील नरेंद्र नार्लावार (६०), निधी नरेंद्र नार्लावार (५३), प्रवीण झिलपिलवार (५८) व दीपाली प्रवीण झिलपिलवार (५४) यांनी प्रत्येकी ४५ हजार, तर राजेश शंकरराव कैलासवार (५०), शिल्पा राजेश कैलासवार (४३), सुनील गंगशेट्टीवार (५८), सचिन उपलेंचवार (५४), रजनी उपलेंचवार (५०), संजय उपलेंचवार (५९), वंदना उपलेंचवार (५३) आदींनी एकूण ५,७२,००० रुपये ऑनलाईन जमा केले होते.
वंडरलस्ट एक्सप्लोरर कंपनीचे व्यवस्थापक कादंबरी देवल यांचेशी संपर्क करुन यात्रेकरुंनी पैशाची मागणी केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राजेश कैलासवार, शिल्पा कैलासवार, सुनील गंगशेट्टीवार, संगीता सुनील गंगशेट्टीवार, सचिन प्रकाश उपलेंचवार, रजनी सचिन उपलेंचवार, संजय यशवंत उपलेंचवार, वंदना संजय उपलेंचवार यांनी प्रत्येकी ४९ हजार रुपये अशा एकूण १२ जणांनी एकूण ५ लाख ७२ हजार रूपये वंडर एक्सप्लोरर या कंपनीच्या व्यवस्थापक कादंबरी देवल यांच्या खात्यात ऑनलाइन जमा केले होते. मुंबई येथील वंडर एक्सप्लोरर ही कंपनी नेहमीच देश – विदेशात प्रवाशांसाठी यात्रा आयोजित करत असते. या कंपनीने २ ते १२ जूनपर्यंत चार धाम यात्रा आयोजित केली होती. त्यात नागपूर ते दिल्ली प्रवास विमानाने, दिल्ली ते केदारनाथ ट्रॅव्हल्स बसने व मंदिरात जाण्याचा प्रवास हेलिकॉप्टरने करण्याचे ठरले होते.
यात्रेच्या आठ दिवस अगोदरपर्यंत कंपनीच्या वतीने कोणत्याही प्रकारचे विमान तिकीट पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकाने फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे १२ यात्रेकरुंनी अखेर पांढरकवडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे व पोलीस पथक करित आहे.
दरम्यान, मुंबई येथील वंडरलस्ट एक्सप्लोरर कंपनीच्या व्यवस्थापक कांदबरी महेंद्र देवल यांची प्रतिक्रिया घेतली असता, मला पांढरकवडा पोलीस स्टेशन कडून सुचनापत्र मिळाले आहे. तथापि, ज्या तारखेला यात्रा होती त्या तारखेला यात्रा झालेली नाही. दुसरे टुर्स केरला, राजस्थान जाणार आहे. ज्यांना केरला, राजस्थान जायचे आहे. त्यांना त्याच पैशात तेथे नेणार आहे. कदाचित जे जाणार नाही, त्यांचे पैसे परत मिळणार आहे. विशेषतः पांढरकवडा येथील यात्रेकरु सोबत माझे बोलले झाले असुन माझे विरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार पुर्णता खोटी व चुकीची आहे. तसेच माझ्या कडे यात्रेबाबतचे संपूर्ण पुरावे असुन ते मी पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या चौकशी अधिका-यांकडे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; आरोपीला अटक…
कर्जाचा ओझं! पत्नीची आत्महत्या अन् अंत्यसंस्कारानंतर पतीने लावला गळ्याला दोर…
बीड! पत्रकाराच्या मुलाच्या हत्याकांडात आला नवा ट्विस्ट…
गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…
बीड! बॅटने बेदम मारहाण करणाऱ्या खोक्याला जामीन मंजूर…

