वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी…

पुणे: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सख्खा भावाचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडच्या चऱ्होली पसरीसरात घडली आहे. या प्रकरणात फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी निघाला असून, आरोपी असलेल्या सोमनाथ दादा लकडे आणि शीतल धनु लकडे या दोघांना अटक केली आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

धनू लकडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. कुटुंबामध्ये धनु मोठा भाऊ असल्याने त्याच्या खांद्यावर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी होती. लहान भाऊ सोमनाथ ला सोबत घेऊन तो मेंढपाळ व्यवसाय करायचा. याच दरम्यान सोमनाथ (वय १९) याचे वहिनी शीतल धनु लकडे (वय २५) सोबत अनैतिक संबंध सुरू झाले. दोघांच्या अनैतिक संबंधाची दबक्या आवाजात आजूबाजूला चर्चा सुरू झाली. हीच कुजबुज धनु च्या कानी पडली. पत्नी शीतल आणि भाऊ सोमनाथ यांना त्याने समजवण्याचा प्रयत्न केला. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचले. धनु हा पत्नी शीतल आणि लहान भाऊ सोमनाथ ला मारहाण करायचा. हे प्रकरण मिटवण्यासाठी कौटुंबिक बैठक झाली होती. शीतल आणि सोमनाथने भावाचा काटा काढून त्याला कायमच बाजूला करायच ठरवले. शनिवारी राहत असलेल्या काही अंतरावर हरवलेल्या शेळ्या शोधण्यासाठी दोघे भाऊ गेले. सोमनाथ तयारीने होता. बेसावध असलेल्या भावावर सोमनाथने डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. एक-एक करत अनेक घाव घातल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनूचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी सोमनाथने घटनास्थळावरून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिघी पोलिसात आरोपी सोमनाथ लकडे यानेच दिली. गुंडा विरोधी पथक आणि पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी अनेकांशी संवाद साधला. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही च्या आधारे पोलिस आरोपी सोमनाथ पर्यंत पोहचले. आपल्याच वहिणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून दोघांनी कट रचून हत्या केल्याचे कबूल केले. या प्रकरणी आरोपी सोमनाथ लकडे आणि शीतल धनू लकडेला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास दिघी पोलिस करत आहेत.

सातारा हादरला! घरामध्ये घुसून विवाहित महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या…

पुणे कोंढवा प्रकरणात नवा ट्वीस्ट, प्राध्यापिकेची एन्ट्री…

पुणे! म्हातारा रिसेप्शनिस्ट युवतीला म्हणाला; मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो…

दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध…

पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!