
पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…
पुणे: पुणे शहरातील कात्रज परिसरात मेहुणीच्या प्रेमाला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मनोहर दिनकर शिंदे (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रोहित ऊर्फ बुधाजी मारुती असोरे आणि केशव मोतीराम आसोरे (रा. दोघेही गेवराई, बीड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मृत शिंदे यांचा जमीन खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय होता. शुक्रवारी रात्री त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी रोहितसह त्याच्या दोन ते तीन साथीदारांनी बेदम मारहाण करत शिंदे यांचा जीव घेतला.
कात्रज परिसरातील मांगडेवाडी भागात राहणाऱ्या मनोहर शिंदे यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ते स्वतःचा मुलगा, सासू व घटस्फोटित मेहुणी आणि तिच्या दोन मुलांसोबत राहत होते. तेच सर्वांचा सांभाळ करत होते. दरम्यान, त्यांच्या मेहुणीचे आरोपी रोहित असोरे याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना समजली. यातून त्यांनी रोहित आणि मेहुणीला समज देऊन संबंध तोडून टाकण्याचा सल्ला दिला. पण, शिंदे आणि रोहित यांच्यात वाद झाला. मागील काही दिवसांपासून शिंदे आणि आरोपीमध्ये वाद सुरू होता. याच वादातून आरोपीने आपल्या काही साथीदारांशी संगनमत करून ही हत्या घडवली.
आरोपी रोहित आणि त्याच्याबरोबर असलेले दोन ते तीन साथीदार कात्रज भागातील पवारनगर भागात शुक्रवारी रात्री आला. त्यांनी शिंदे यांना गाठून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात बांबूचा प्रहार केला. त्यात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शिंदे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
मेव्हणी घरात एकटीच असल्याचे पाहून दाजी घरात घुसला अन्…
प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…
प्रेमापोटी मेव्हणीला दिला महागडा मोबाईल गिफ्ट अन् पुढे…
मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…
वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना…

