
नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून दगडफेक; अनेक पोलिस जखमी…
नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.
नाशिक महानगरपालिकेने एका धार्मिक स्थळाला नोटीस बजावली होती. संबंधित धार्मिक स्थळ काढून घेण्याच्या सूचना नोटीसमधून करण्यात आल्या होत्या. दोन दिवसांत संबंधित धार्मिकस्थळ पाडले जाईल, असे सांगण्यात येत होते. याबाबतची अफवा पसरल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये याचे पडसाद उमटले. ३०० ते ४०० जणांच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली. यावेळी जमावाने काही वाहनांचे देखील नुकसान केले आहे.
जमावाने अंदाधुंद केलेल्या दगडफेकीत दोन सहाय्यक पोलिस आयुक्त आणि 20 हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले. यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा काठे गल्ली परिसरातील लाईट गेली होती. याचा फायदा घेऊन जमावाने पोलिसांना टार्गेट केले. याप्रकरणी पोलिसांनी आता समाजकंठाकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दगडफेक करणाऱ्या जमावातील 8 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत मंगळवारी सायंकाळी शहरात अफवा पसरली होती. यामुळे तणाव निर्माण झाला होता. याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मंगळवारी रात्री नाशिकच्या काठे गल्ली परिसरात ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात जमावाने एकत्र येत पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पोलिसांनी काही समाजकंठकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे. सध्या नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

