
पुणे! चहाच्या टपरीवर सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोष पहिल्याच दिवशी होरपळून मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात असलेल्या एका चहाच्या दुकानात दूध तापवताना सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत संतोष हेगडे (वय २०) या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे.
रविवारी (ता. ३०) सायंकाळी चारच्या सुमारास दुकानातील कामगार संतोष चहा बनवत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामुळे ग्राहक आणि अन्य कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. मात्र, संतोष हेगडे दुकानात अडकला. स्फोटानंतर आग भडकली आणि आगीच्या झळा शेजारच्या दोन दुकानांनाही बसल्या, ज्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी संतोष याला तातडीने आगीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तीन सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळत असल्याचे आढळून आल्याने अग्निशमन दलाने हे सिलेंडर ताब्यात घेतले. वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणून रस्ता मोकळा केला. घटनेचा पुढील तपास धनकवडी पोलीस आणि अग्निशमन विभाग करत आहे.
दरम्यान, संतोष हेगडे असे मृत्यू झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. हृदयद्रावक बाब म्हणजे, या चहाच्या दुकानात संतोष याचा पहिलाच दिवस होता. मृत्यू झालेला कामगार सोलापूर जिल्ह्यातील हिजगी गावचा राहिवासी असल्याची माहिती आहे. मृत्यू झालेल्या कामगाराला आई-वडील नसल्याची प्राथमिक माहिती देखील मिळाली आहे. दरम्यान, हॉटेल चालक केशव श्रीमंत जाधव हा बीडचा आहे. मृत्यू झालेल्या कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.
पुणे-नाशिक विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू…
पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट…
नवविवाहितेची आत्महत्यानंतर घरच पेटवलं, सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू…
पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला आग; सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू…
नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

