
विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार अन् मुख्याध्यापकाची आत्महत्या…
नांदेड : विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
नांदेडमधल्या खासगी शाळेतील मुख्याध्यापकावर त्याच शाळेच्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप झाला. यानंतर पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली आणि कुटुंबातील नातेवाइकांनी पोलिस स्टेशन गाठत मुख्याध्यापकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला.
दरम्यान, मुख्याध्यापकाला आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच विष पित आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुख्याध्यापकाने एक चिठ्ठीही लिहिली होती. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…
शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला वारंवार अत्याचार अन् गर्भपातही…
शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…
Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

