पुणे शहराजवळ यूनिट-६ने केली दारू भट्टी उद्धवस्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या वाडेबोल्हाई-बिवरी शिवेवरील अवैध दारू भट्टी गुन्हे शाखा यूनिट -६ने उध्वस्त केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार असे 12/02/2025 रोजी युनिट हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करीत असताना ऋषीकेश व्यवहारे व ऋषीकेश ताकवणे यांना माहिती मिळाली होती. वाडेबोल्हाई-बिवरी शिवेवरील नदी किनारी पथरसिंग नाथा राजपूत (रा. वाडेगाव, ता. हवेली, जि. पुणे) हा भट्टी लावून दारू काढत असताना मिळून आला असून त्याचे ताब्यात सुमारे 9,800 लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य व 70 लीटर तयार दारू असा एकूण 3,55,000/-रू किं चा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर आरोपीविरुद्ध लोणीकंद पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे – 2 राजेंद्र मुळीक, प्रभारी पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा यूनिट -६ वाहिद पठाण, सहा पोलिस निरीक्षक मदन कांबळे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे यांनी केली आहे.

पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती…

प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…

माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…

पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेडया…

पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारा ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!