
धक्कादायक! रिसॉर्टमध्ये युवतीने केला युवतीवर सलग तीन दिवस बलात्कार…
मुंबई: दक्षिण मुंबईत एका 17 वर्षीय युवतीचे अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेवर बलात्काराचे कलम जोडले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पीडित मुलगी दक्षिण मुंबईत तिच्या आजीसोबत राहते. तिचे आई वडील मुंबईच्या पूर्व उपनगरात राहतात. ७ जानेवारीला ती कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली होती. यानंतर मुलीने आईला मेसेज करून स्वतःहून घर सोडले आहे, काळजी करू नये, असा मेसेज केला. या प्रकार समजल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. काही तासांनंतर तिचा फोन बंद झाला. यानंतर कुटुंबाने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत मुलीचा शोध घ्यायला सुरूवात केली.
पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिलेचे कॉल डिटेल्सही मिळवले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघींचा माग घेतला. पोलिसांना आरोपी महिलेने नवीन सिम कार्ड खरेदी केल्याचा संशय आला. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सिम कार्ड विक्रेत्यांची चौकशी केली आणि आरोपी महिलेचा फोन नंबर शोधून काढला. या नंबरचे लोकेशन ट्रेस करण्यात आले आणि पोलिस विरारमधील एका रिसॉर्टमध्ये पोहोचले. तेव्हा आरोपी महिला आणि पीडित मुलगी तिथे आढळून आली. दोघींनी रिसॉर्ट मध्ये राहण्यासाठी आपण बहिणी असल्याचे सांगितले होते. तसेच एका परीक्षेसाठी विरारला आल्याचं त्यांनी सांगितले होते.
पोलिसांना चौकशीदरम्यान, दोघींनी एकमेकींवर प्रेम असल्याचे सांगितले. पण पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी आरोपी तरुणीवर पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच तिची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. नंतर तिला भायखळा येथील महिला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी पीडित मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याता प्रयत्न केला. पण मुलीने घरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.
वर्षभरापूर्वी आरोपी युवती आणि पीडित मुलीची जवळीक वाढत असल्याची शंका कुटुंबियांना आली होती. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलीला दुसऱ्या जिल्ह्यातील नातेवाईकांकडे पाठवले. एक वर्षानंतर मुलगी मुंबईत परतली होती. यानंतर पुन्हा दोघींमध्ये जवळीक वाढल्याची माहिती पुढे आली.
हनिमूनच्या रात्री पत्नीने गरोदर असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…
हनिमूनच्या रात्री समजलं की नवरा समलिंगी अन् पुढे…
हनिमूनच्या रात्री नवऱ्याबाबत समजली खरी माहिती अन् तिने थेट…
हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…
हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…

