
महिलेची सासरच्यांविरोधात तक्रार दाखल; नवऱ्याला अटक…
पुणे (संदिप कद्रे): महिलेने सासरच्यांविरोधात विमानतळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘१९/०४/२०२३ ते जुन २०२४ रोजी पर्यंत माझे पती हर्षल अनिल मेमाने याने दारु पिवून येवून माझी शारीरीक, मानसीक व आर्थीक छळवणूक करुन मला जबरदस्ती करुन जबरदस्तीने अनैसर्गीक रित्या शारीरीक संबंध ठेवून, माझा गर्भपात करुन माझे अश्लील फोटो व व्हीडीओ सोशल मेडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सासरे अनिल तुकाराम मेमाने यांनी मी किचन मध्ये एकटी असतांना वाईट हेतूने माझ्या पाठीमागून हात घालून मला त्यांचे जवळ ओढून विनंयभंग केला. तसेच दिर कौशल अनिल मेमाने याने मी बेडरुममध्ये एकटी असतांना दरवाजा नॉक न करता रुममध्ये येवून माझ्या गालाला वाईट हेतूने हात लावून मी तुला दादापेक्षा जास्त खुश ठेवेल असे म्हणुन माझेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन माझा विनयभंग केला. सासु यांनी मला किरकोळ कौटुंबीक वादातून मारहाण करुन शिवीगाळ करुन सतत पैशाची मागणी करुन मला जिवे मारण्याची धमकी दिली. माझे सासरचे वरिल लोका विरुध्द कायदेशिर कार्यवाही करावी वगैरे फिर्याद दिल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.’
दरम्यान, महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी हर्षल अनिल मेमाने (वय २७) यास दि. २०/०१/२०२५ रोजी अटक केली असून, विमानतळ पोलिस पुढील तपास करत आहेत.
Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…
धक्कादायक! पुणे शहरात चिमुकल्यासमोरच कात्रीने कापला पत्नीचा गळा; सांगितलं कारण…
पुणे शहरातील बोपदेव घाटात दहशत माजविणाऱ्यांना सात जणांना केली अटक; पाहा नावे…
पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…
लखोबा लोखंडे! पुणे शहरातील एकाने 25 हून अधिक महिलांची केली फसवणूक अन्…

