धक्कादायक! युवकावर अनैसर्गिक अत्याचार करून केली हत्या…

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे एका 17 वर्षीय मुलाचे डोकं दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी एका काटेरी झाडीत तरुणाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली आहे.

दिनेश उर्फ गोलू उईके (वय २०) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी दिनेश यानेच पीडित युवकावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने आधी 17 वर्षीय युवकावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीडित मुलगा गुरुवारी रात्री दहा वाजता संभोरा चौकातून परत येतो, असे वडिलांना सांगून घराबाहेर गेला होता. मात्र, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे पीडित तरुणाच्या आई वडिलांनी मोर्शी पोलिस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. शुक्रवारी अमरावती मोर्शी रस्त्यावरील येरला गावाजवळ युवकाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. रस्त्यावरून जाणाऱ्या काहीजणांनी सर्वप्रथम हा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. युवकाचा मृतदेह आढळून आला, त्याच शेतात त्याच्या चपला आणि पँट पोलिसांना आढळून आली आहे. युवकासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश उईके याला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तुकडे केले अन् कुकरमध्ये शिजवले…

नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या अन् गेली; हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत सापडली…

महिलेला मदतीच्या बहाण्याने अंधारात घेऊन गेले अन् केला सामूहिक बलात्कार…

वृद्ध व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले; एका खोलीत घेऊन गेली अन्…

धुळे शहरात मित्रानेच केला मित्राचा किरकोळ वादातून खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!