
विनोदने पार्टी सुरू असताना हसत सेल्फीही काढला अन् एका क्षणात…
छत्रपती संभाजीनगर : धूलिवंदनाच्या दिवशी जुने वाद उफाळून आल्याने पार्टीत सहभागी झालेल्या अन्य दोन मित्रांच्या मदतीने चेतन संजय गिरी या युवकाची तिघांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
चिकलठाण्याच्या पुढे बंद पडलेल्या हॉटेलमध्ये दारूची पार्टी सुरू असताना ही घटना घडली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी संशयित पवन मिसाळ आणि नवनाथ दहिहंडे यांना ताब्यात घेतले आहे. फायनान्स कंपनीचे रिकव्हरी काम करणाऱ्या चेतनची अमोल आणि नवनाथ दहिहंडेसोबत मैत्री होती. अमोलने काही महिन्यांपूर्वी जालना रस्त्यावरील हॉटेल सुगरणच्या मागील बाजूस बंद हॉटेलची जागा भाड्याने घेतली होती. सोमवारी त्याने तिथे धूलिवंदनाचे आयोजन केले होते. यावेळी चेतन, नवनाथ दहिहंडेसह अनेक तरुण, तरुणी सहभागी झाले होते.
पार्टीदरम्यान तिघांची प्रॉपर्टीच्या व्यवहारावरून चर्चा सुरू होती. तेव्हाच त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. यानंतर चेतन आणि दहिहंडे यांच्यात धक्काबुक्की झाली. रागात दहिहंडेनं मिसाळ आणि विनोद यांना बोलावून घेतले. यानंतर हा वाद मिटला. मात्र तिथून पुढे मिसाळ आणि विनोदने दारूच्या बाटल्या आणल्या आणि पार्टी सुरू झाली. पार्टी सुरू असताना विनोदने चेतनसोबत हसत सेल्फीही काढला. फोटो काढल्यानंतर पुन्हा त्यांनी जुना वाद उकरून काढत चेतनला मारहाण सुरू केली. दहिहंडेने चेतनच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. विनोदने त्याच्या पोटात चाकू खुपसला. यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने चेतनच तिथेच मृत्यू झाला. या घटनेत अमोलही जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
अहमदनगर हादरलं! दारुड्याने संशयावरून पेटवले घर, तिघींचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…
पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू…
खजिना सापडल्याचे सांगून लुटले अन् तिघांना जिवंत जाळले…
Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात…

