
वाहनधारकांना मोठा दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहनवरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य…
मुंबईः डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. वाहतूक पोलिस ही कागदपत्रे ग्राह्य न धरता वाहनचालकांवर कारवाई करत होते, याप्रकरणी वाहनधारकांनी वाहतूक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे.
वाहतूक सहपोलिस आयुक्तांनी डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे लेखी आदेश दिले आहेत. वाहन चालकांनी वाहनाची डिजिटल कागदपत्रे दाखवूनही चालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता सहपोलिस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी गुरूवारी याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे वाहन चालक प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिलॉकर अॅपच्या मदतीने वाहतूक पोलिसांना कागदपत्रे दाखवू शकतात.
दरम्यान, केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी वाहन चालक परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी डिजिटल लॉकर आणि एम परिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 आणि 5 नुसार चालक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमाअशा कागदपत्रांची प्रत्यक्षप्रद दाखवणे बंधनकारक नाही. डिजिलॉकर आणि एमपरिवहन अॅपवर उपलब्ध कागदपत्रांची डिजिटल प्रत वैध मानली जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना यासंदर्भात सूचनाही दिल्या होत्या. पण त्यानंतरही वाहन मालक, चालक यांनी त्यांचे डिजी लॉकर ॲपमधील त्यांना जारी करण्यात आलेला परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पी.यु.सी. यांची डिजीटल प्रत दाखवून सुद्धा त्यांच्यावर ई-चलानद्वारे कारवाई केल्या जात होत्या. त्यामुळे बुधवारी वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी लेखी आदेश जारी करून डिजिलॉकर आणि एमपरिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखवण्यात आलेले चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पीयुसी ग्राह्य धरण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित नियम बदलणार; अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची माहिती घ्या जाणून…
वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

