
अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले…
चंदीगड (पंजाब): अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाला असून, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.
सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. आज (बुधवार) पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोराच्या गोळीबाराने सुवर्ण मंदिराबाहेर खळबळ उडाली. मात्र, तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडले आहे..
अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल द्वारपाल म्हणून सेवा करत होते, त्याचवेळी गोळीबार करण्यात आला. ते सुवर्ण मंदिराच्या दरबार साहिबच्या गेटवर द्वारपाल म्हणून काम करत होते. तेवढ्यात समोरून हल्लेखोर आला आणि त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सुखबीर सिंह बादल यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सैनिकाने हल्लेखोराला रोखले आणि गोळी झाडली. मात्र, ही गोळी कोणालाही लागली नाही.
सुरक्षारक्षकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडले आहे. नारायण सिंह चौडा असे आरोपीचं नाव आहे. आरोपींवर यापूर्वीही अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जीवीतहानी झालेली नाही. हल्लेखोर खलिस्तानी कारवायांमध्ये सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…
अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…
IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…
भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या; तपासात धक्कादायक माहिती समोर…

