लोणावळा येथे सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई केली असून, 3 किलो गांजा व प्रतिबंधित गुटखासह सुमारे 3 लाख 87 हजार रूपयांचे मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांना जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणार्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.

दिनांक 21/9/2024 रोजी मध्यरात्री सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लोणावळा भागातील भैरवनाथ नगर कुसगाव बु. परीसरात राहणारे काही व्यक्ती त्यांचे राहते घरातुन गांजा व प्रतिबंधीत गुटखा त्यांचे ओळखीचे लोकांना विक्री करत आहेत. सत्यसाई कार्तिक यांनी रात्रीपासूनच भैरवनाथनगर परिसरात त्यांचे पथकासह सापळा रचला होता. मिळालेल्या बातमीप्रमाणे 21/9/2024 रोजी रात्री 00:09 वाजताच्या सुमारास लक्ष्मी लॉंड्रीजवळ भैरवनाथनगर, कुसगाव बु. ता. मावळ जि. पुणे येथे मिळालेले बातमीचे ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी 3 जण मिळून आले. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष त्यांच्या ताब्यातील क्वालिस गाडी व घर झडतीमध्ये 737 ग्रॅम गांजा व चारचाकी वाहनामध्ये 128 पुड्डे विमल पान मसाला प्रतिबंधित गुटखा मिळुन आला आहे. सदर कारवाईमध्ये गांजा, प्रतिबंधीत विमल पान मसाला गुटखा व चारचाकी वाहन असा एकुण 3 लाख 27 हजार 137 रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला आहे. यातील इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल विक्री करता जवळ बाळगला असल्याचे सांगितले आहे.

सदरच्या कारवाईमध्ये आरोपी
1) आब्बास तपषिर खान उर्फ अरबाज वय 21
2) आवान आब्बास तपषिर खान उर्फ मुन्ना वय 19, दोघे रा. लक्ष्मी लॉंड्रीजवळ, भैरवनाथनगर, कुसगाव बु. ता. मावळ जि. पुणे
3) अश्विन चंद्रकांत शिंदे वय 38 वर्शे रा. के के बाजार समोर कुसगाव बु. ता. मावळ जि. पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरोधात पोहवा सिताराम बोकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पो.स्टे. येथे एनडीपीएस व इतर विविध कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पो.स्टे चे सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत.

दिनांक 22/9/2024 रोजी मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील इंद्रायणीनगर लोणावळा येथे महिला नामे महेमुना सत्तार कुरेशी हि आपले राहते घरातुन तिचा कामगार राजु लहु जाधव रा. इंद्रायणीनगर या हस्तकांकरवी ओळखीचे व्यक्तींना गांजा या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने पंचासमक्ष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी 2 किलो 168 ग्रॅम गांजासह रोख रक्कम असा एकुण 59 हजार 880 रूपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन यातील इसमांकडे केलेल्या प्राथमि चौकशी मध्ये सदरचा माल विक्री करता जवळ बाळगला असल्याचे सांगितले आहे.

सदरच्या कारवाई मध्ये आरोपी
1) महेमुना सत्तार कुरेशी वय 5
2) राजु लहु जाधव वय 55 दोघे रा. इंद्रायणीनगर, लोणावळा ता. मावळ जि. पुणे यांचेविरोधात लोणावळा शहर पोलिस स्टेशनला पो कॉ सुभाश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस व इतर कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. भिसे हे करत आहेत.

संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील दोन्ही कारवाईमध्ये अंदाजे 3 किलो गंजा, 128 प्रतिबंधित विनम पान मसाला गुटख्याचे पुड्डे व एक क्वाॅलीस गाडी असा एकूण रु.3, 87, 000/- (अक्षरी – तीन लाख सत्याऐंषी हजार) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलिस यंत्रणा सखोल तपास करत आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि प्रशांत आवारे, मसपोनि विजया म्हेत्रे, सपोनि राहुल लाड, पोलिस उपनिरीक्षक लोसरवार, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, मपो.हवा अश्विनी शेडगे, पो.कॉ गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, गणेश ठाकुर, प्रतिक काळे , पोहवा/ हनुमंत वाळंज, संदिप मानकर, पोना हनुमंत षिंदे, पवन कराड, मपोशी अक्षदा तावरे, कोमल निंबाळकर या पथकाने केली आहे.

लोणावळा पोलिसांनी कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त…

लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच…

लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…

आयपीएस सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच…

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत दणकेबाज कारवाई…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!