
वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…
जळगाव : प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा ब्लेडच्या सहाय्याने पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून खून केला. यानंतर अपघात वाटावा म्हणून मृतदेह कोदगाव शिवारात महामार्गावर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा उघड केला असून, याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक केली आहे.
बाळू सिताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोंगरी ता. नांदगाव) असे खून आलेल्या व्यक्तीने नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे बुधवारी उघडकीस आली. बाळू सीताराम पवार हा पत्नी वंदना पवार (वय ३०) हिच्यासह नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी येथे राहत होता. तिचे व चुलत दीर गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याशी मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वंदना व बाळू हे मंगळवारी (ता. १८) न्यायडोंगरी येथून चाळीसगाव येथे आले. बाळू यास गजानन याने दारू पाजली. सायंकाळी गजानन यास दुचाकीने कोदगाव (ता. चाळीसगाव) शिवारात नेले. तिथे वंदनाने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले. मृतदेह महामार्गावर टाकून दिला. बाळूच्या खिशात आधारकार्ड ठेवले. यानंतर दोघे तेथून पसार झाले.
राष्ट्रीय महामार्ग ५२ वर कोदगाव शिवारात १८ रोजी रात्री ११ वाजेच्या पूर्वी बाळू सिताराम पवार याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड मिळून आला. बाळू पवार याच्या शरीरावर ब्लेड व दगडाने मारल्याचा खुणा आढळून आल्या. दगड व ब्लेडने गंभीर दुखापत करून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच मृत्युमुखी पडलेल्या इसमाच्या पत्नीला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. व्यसनाधीन पतीच्या त्रासाला कंटाळून व चुलत दिराशी असलेल्या प्रेम संबंधातून खून केल्याची कबुली संशयित आरोपी वंदना पवार हिने दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…
दीर आणि वहिनी झाडाखाली थांबले-थांबले अन् पुढे…
दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…
दीर आणि वहिनीच्या हातात नको त्या कृत्यामुळे पडल्या बेड्या…
हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

