Video: पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे नाशिककरांना आवाहन…

नाशिक : पोलिस प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून, भयमुक्त वातावरणात आपण मतदान करावे आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांना आपण मतदान करून साथ द्यावी, असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिककरांना केले आहे. नाशिकमध्ये शंभर टक्के मतदान होईल, असे आवाहान आणि अपेक्षाही पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी व्यक्ती केली आहे.

लोकसभा निवडणुकीत सोमवारी (ता. २०) नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीअंतर्गत जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने त्याच्या स्तरावर जाणीवपूर्वक जनजागृती करावी. कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करताना तेथे हे प्रमाण वाढविण्याकरिता तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर्सला विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्या, असे आदेश एस. चोक्कलिंगम् यांनी दिले आहेत. शिवाय, नाशिकमध्ये भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन संदीप कर्णिक यांनी केले आहे.

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!