
पुणे शहरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरातून गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री अलंकार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कर्वे रोड परिसरात एका युवकाचा कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
श्रीनिवास हा मित्रासोबत मध्यरात्रीच्या सुमारास जात होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील गांधी चौक परिसरात पाच ते सहा जणांनी त्यांना अडवले आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. श्रीनिवास त्याचसोबत असणारा व्यक्ती पळून गेला. मात्र श्रीनिवास हल्लेखोरांच्या ताब्यात सापडला. त्यानंतर हल्लेखोरांनी अतिशय निर्घृणपणे कोयत्याने वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या श्रीनिवासला तातडीने नजीकच्या खाजगी रुग्णालयात घेण्यात आले. मात्र तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. चार ते पाच मारेकरी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्ववैमस्यातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलंकार पोलिस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरात मुलीबाबत अपशब्द वापरल्याने युवकाचा खून…
पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खून; आईच्या हत्येनंतर मुलगा…
पुणे शहरात पत्नीचा छातीत जोरात बुक्क्या मारून केला खून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

