
वानवडी पोलिसांनी ५०० सीसीटीव्ही फुटेज पाहून वाहनचोरला ठोकल्या बेड्या…
पुणे (संदिप कद्रे): वानवडी परिसरात वाहनचोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील वाहनचोरला तब्बल ५०० सीसीटीव्ही फुटेज पाहून जेरबंद करण्यात वानवडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
१३/०३/२०२४ रोजी रात्रौ ०१/०० वा. ते पहाटे ०३ / ४५ वा. चे दरम्यान ग्रीन व्हॅलीजवळ गोपाळ मेडीकल समोर, वानवडी येथे फिर्यादी यांनी त्यांची टिव्हीएस कंपनीची ग्रे रंगाची अपाचे आरटीआर २०० मो.सा. क्र. एम एच १२ पी वाय ८९२५ ही लॉक करुन पार्क केलेली असताना चोरुन नेली होती. त्याबाबत वानवडी पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. २०८/२०२४, भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सीसीटिव्ही चेकींग व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींगसाठी दोन पथके तयार केली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही मध्ये दिसणारा संशयीत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार कासीम सलीम इराणी (रा. पठारे वस्ती, इराणी कॉलनी, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) हा असल्याचे माहिती पोलिस अंमलदार विष्णू सुतार, यतिन भोसले, गोपाल मदने यांना मिळाली होती. सदर बाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पतंगे साो यांना कळवून तपास पथक प्रभारी संतोष सोनवणे व स्टाफ रवाना झाले. मिळालेल्या माहितीचे आधारे चोरी करणाऱ्या कासीम सलीम इराणी यास ताब्यात घेवून त्यास अटक करण्यात आली.
पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?
आरोपीकडे अधिक तपास करता त्याने त्याचे साथीदार मोहम्मद सय्यद इराणी (वय ३०, रा. सदर) याचे मदतीने सदर वाहनचोरी केली असल्याचे तसेच वानवडी पोलिस स्टेशन हद्दीत आणखीन एक ठिकाणी वाहनचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद आरोपीकडून १) वानवडी पोलिस ठाणे येथे गु.र.नं. २०८/२०२४, भा.दं.वि. कलम ३७९ २) वानवडी पोलिस ठाणे येथे गु.र.नं. १७८/२०२४, भा.दं.वि. कलम ३७९ हे गुन्हे उघड करण्यात आलेले असून सदर गुन्हयातील चोरीच्या कि.रु. १,१०,२५०/- च्या टिव्हिएस अपाची व सुझुकी अॅक्सेस असे दोन दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त परि.-५, पुणे शहर आर राजा, व सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय पतंगे, पोलिस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलिस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलिस हवालदार सर्फराज देशमुख, वानवडी पोस्टे पुणे हे करत आहेत.
हाय प्रोफाईल चोर! पुणे शहरात विमानाने येऊन चोरी करणारी टोळी गजाआड…
पुणे शहरात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद…
पुणे शहरात मुलीबाबत अपशब्द वापरल्याने युवकाचा खून…
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

