
हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…
अकोला: घरात लग्नाची तयारी सुरु असताना लग्न ठरलेल्या नववधूला होळीचा सण देण्यासाठी कुटुंब इंदूरला गेले होते. आई-वडिलासह इंदूरवरुन परत येताना मोटारीला अपघात झाला. अपघातामध्ये डॉक्टर निलेश माळोदे आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी रामराव माळोदे यांचा मुलगा दंत शल्य चिकित्सक डॉ. निलेश माळोदे याचा विवाह इंदूर येथील एका मुलीशी ठरला होता. नववधूला होळीचा सण देण्यासाठी रामराव लक्ष्मण माळोदे, डॉ. निलेश माळोदे आणि सौ. संगीता रामराव माळोदे हे तिघे जण मोटारीने इंदूर येथे गेले होते. कार्यक्रम आटपून रविवारी संध्याकाळी परत बाळापूर येथे येत असताना गावाच्या वेशीवर पोहोचताच मोटारीला घातला. अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू झाला. खामगाव ते बाळापूर मार्गावरील हॉटेल सुदर्शन ढाब्याजवळ रविवारी रात्री ही घटना घडली आहे.
अकोलाकडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला समोरून धडक दिली. या धडकेत कार तीन ते चार वेळा पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. या अपघातात डॉ. निलेश माळोदे त्याची आई सौ. संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. निलेशचे वडील रामराव माळोदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान, डॉक्टर निलेश रामराव माळोदे यांचा येत्या २० एप्रिल रोजी विवाह होणार होता. घरामध्ये विवाहाची तयारी सुरू होती. नातलग आणि मित्रांना निमंत्रणपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या होत्या. परंतु लग्नाआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यामुळे माळोदे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हृदयद्रावक! कन्येचा विवाह सोहळा पार पडला अन् बापावर काळाने घाला घातला…
हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…
हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

