Video: मुंबईत पोलिसकाकाच्या मुलावर टोळक्याचा हल्ला…

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात पाच जणांच्या टोळक्याने मिळून एका निवृत्त पोलिस हवालदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना धारावी जंक्शनवर घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पाच जणांनी फायटर आणि लाथा बुक्क्यांनी जमिनीवर पाडून पोलिसकाकाच्या मुलावर हल्ला चढवला. झाडाच्या कुंड्या, ड्रम त्याच्या डोक्यात घातले. या अचानक झालेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धारावी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मारहाण झालेला युवक हा निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असून, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलावर हल्ला करणारे पाच जण अद्याप फरार आहे. आरोपी मुंबई येथील प्रतीक्षा नगर आणि किदवई मार्ग येथील रहिवासी असून या पाच जणांवर मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असून, पुढील तपास करत आहोत.’

Video: पोलिसकाकाला ट्रकचालकांची लाठ्या काठ्याने मारहाण…

Video: पुणे शहरात टोळक्याने भररस्त्यात तिघांना कोयत्याने सपासप कापलं…

दोघे वृद्ध भाऊ बेसावध असताना माथेफिरूने हल्ला करत घेतला जीव…

Video: नाशिकमध्ये गुंडाचा झेरॉक्स दुकानावर तलवारीने हल्ला; युवती जागेवर बेशुद्ध…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!