महिलेने दाताने तोडला युवकाचा कान अन् गिळला सुद्धा…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका भांडणादरम्यान महिलेने दाताने युवकाचा कान तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कान तोडल्यानंतर महिलेने तुटलेला भाग चक्क गिळला आहे. न्यू आग्रा परिसरात दोन भाडेकरूंमध्ये झालेल्या भांडणादरम्यान ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

न्यू आग्रा परिसरातील देवी नगर नगला पदी येथे राहणारा रामवीर बघेल ई-रिक्षा चालवतो. रामवीरने पोलिसांना सांगितले की, रवींद्र यादव यांच्या घरात तो कुटुंबासह भाड्याने राहतो. इतर कुटुंबही या घरात भाड्याने राहतात. राखी नावाची एक भाडेकरू तेथे राहात आहे. राखीच्या पतीचे नाव संजीव आहे. ती रोज छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असते. 4 मार्च रोजी एका भाडेकरूच्या मुलाचा पेपर बाकी होता. याच कारणामुळे रामवीर सकाळी सहा वाजता रिक्षाने घरून निघाला. दिवसाची वेळ असल्याने मेन गेटला कोणी कुलूप लावलं नव्हते. यावरून राखीने शिवीगाळ सुरू केली. रामवीरने राखीला समजावण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने राखीला शिवीगाळ करण्यापासून रोखले तेव्हा तिला राग आला. दरम्यान, राखीचा पती संजीव याने येऊन रामवीरला पकडले. यानंतर आधीच रागावलेल्या राखीने रामवीरचा कान दाताने चावला. राखीला तुडलेला कानाचा भाग मागितला असता तिने तो गिळून टाकला.

न्यू आग्रा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 325 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस आयुक्त अरीब अहमद यांनी सांगितलं की, रामवीर बघेल यांनी आपल्या शेजारी भाड्याने राहणाऱ्या महिलेने आपल्यावर हल्ला केला आणि मारहाण करत कान तोडल्याचा आरोप केला आहे. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे.

मित्राने गुप्तांगावर हाताचा कोपरा मारला अन् गेला जीव…

पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…

हॉटेलमध्ये ग्राहकाच्या प्रायव्हेट पार्टला चावला विंचू तब्बल चार वेळा…

अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…

ड्राय आईस! हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!