मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टलसह तडीपार आरोपीला केले गजाआड…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल व राऊंडसह तडीपार आरोपीला गजाआड केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रविण पवार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी मुंढवा पोलिस ठाणे कडील तपास पथक अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे व अंमलदार स्टाफ रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, पाहिजे/फरारी, तडीपार आरोपी शोध तसेच गुन्हे प्रतिबंधक करणेकरीता पेट्रोलिंग करून प्रभावी कारवाई करणे करीता सुचना देवून पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलींग कामी रवाना केले.

पेट्रोलिंग करत असताना सायं. १८.०० वा. चे सुमारास लोणकर चौक, केशवनगर भागामध्ये पेट्रोलींग चालू असतांना पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली “मुंढवा पोलिस ठाणे रेकॉर्डवरील व सध्या तडिपार असणारा गुन्हेगार तेजस कुपेंद्र पायगुडे (रा. केशवनगर मुंढवा पुणे) हा लोणकर पेट्रोलपंपाचे मागे आला असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात घेतले आहे. पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ- ५, पुणे शहर यांचेकडील महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) चा भंग केला असल्याने त्यास पुढील कायदेशिर कारवाई करीता ताब्यात घेणे गरजेचे असल्याने सहा. पोलिस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे यांनी त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेस एक गावठी कट्टा मिळुन आला व अधिक झडती घेतली असता त्याचे पँटचे उजव्या खिशा मध्ये दोन काडतुस (राऊंड) मिळुन आले.

तेजस कुपेंद्र पायगुडे हा तडीपार असतांना देखील आदेशाचा भंग करुन गावठी कट्टा व राऊंडसह फिरत असल्याने सरकार तर्फे कायदेशिर फिर्याद देवून मुंढवा गुन्हा रजि. नंबर ९४/२०२४ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२, व आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. तेजस कुपेंद्र पायगुडे (वय २७ रा. फ्लॅट नं. ३०१ साई निवास, जयगंगा नगर शेजारी, लोणकरवस्ती केशवनगर मुंढवा पुणे) याचे विरुद्ध दखलपात्र ०४ गुन्हे, अदखलपात्र ०१ गुन्हे. असे गुन्हे नोंद आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, पोलिस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ – ५ पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलिस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, सहा. पोलिस फौजदार, संतोष जगताप, पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, राहूल मोरे, हेमंत झुरुंगे, सचिन पाटील यांनी केली आहे.

पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार

मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…

‘Jennifer And The Beast’ पुस्तक Online खरेदी करा…

पुणे शहरात रिक्षांचे टायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांनी केले गजाआड…

मुंढवा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला केले गजाआड…

मुंढवा पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्यास २४ तासात केली अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!