दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी केले जेरंबद…

पुणे (संदिप कद्रे): दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी जेरंबद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

येरवडा पोलिस स्टेशन कडील पोलिस अंमलदार श्रीनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गु र नं १६३/२०२२ भादवि कलम ३०२, २०१, ३४ मधील पाहिजे आरोपी अनिकेत उर्फ उ-या आकाश उरणकर हा बर्निग घाट कोरेगाव पार्क पुणे येथे थांबलेला आहे. सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा पोलिस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे पोलिस अंमलतार श्रीनाथ कांबळे व तपास पथकाचे अंमलदार यांनी तेथे जावून बातमीप्रमाणे एक जण थांबलेला दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतेल.

अनिकेत उर्फ उ-या आकाश उरणकर (वय २५ वर्षे रा.गंगाधाम चौक मार्केटयार्ड पुणे) असे जेरंबद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी करता त्याने गुन्हयाची कबूली दिल्याने व त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेने त्यास पुढील कार्यवाहीसाठी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ ४ (अतिरिक्त कार्यभार) विक्रांत देशमुख, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, संजय पाटील येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस, निरीक्षक (गुन्हे), आशालता खापरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार श्रीनाथ कांबळे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांनी केली आहे.

येरवडा तपास पथकाने चोरी करणाऱ्यास २४ तासात केले जेरबंद…

येरवडा हद्दीत गुन्हे करणाऱया टोळीवार मोक्का अंतर्गत कारवाई; पाहा नावे…

पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…

पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…

पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!