
नाशिकमध्ये खून करून फरार झालेल्या दोघांना युनिट १ने ठोकल्या बेड्या…
नाशिक: खून करून फरार झालेले अनोळखी आरोपी निष्पन्न करून दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करून खुनाचा उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट क्र. १ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
नाशिकरोड पोलिस ठाणे कडील गुरनं ९१/२०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दि. १८/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या. पोलिस उप आयुक्त गुन्हे श्री. बच्छाव व मा. सपोआ डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखा युनिट कमांक १ यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क. १ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत होते.
सदर गुन्हयातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटविणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ यांनी सदर मयताची ओळख पटवून त्याचे नाव चेतन आनंदा ठमके (रा-सावरकर नगर अंबड, नाशिक) हा असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना अज्ञात आरोपीचे नाव व पत्ता तात्काळ निष्पन्न केले. गुन्हेशाखा युनिट क १ कडील पोअं/२५४४ मुक्तार शेख व पो / १४०५ आप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदार यांचे माफतीने बातमी मिळाली की, गुन्हयातील पाहिजे आरोपी पंकज आहेर व त्याचा मित्र आशिष भारद्वाज हे एका पांढ-या रंगाच्या एक्टीव्हा मोटार सायकलवर सातपुर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती वपोनिरी/अनिल शिंदे यांना दिली त्यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करून संशयीतास ताब्यात घेणे कामी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील सपोनि/ हेमंत तोडकर, सपोउनि / सुगन साबरे, पोहवा/७३९ देविदास ठाकरे, पोना/ १८९४ मिलीदसिंग परदेशी, पोअं/२५४४ मुक्तार शेख, पोअं/ २०६९ विलास चारोस्कर, पोअं/२५१२ नितीन जगताप, पोअं/२१५४ राहुल पालखेडे, पोअं/१४०५ आप्पा पानवळ, पोअं / २४५० राजेश राठोड अशांचे पथक पाठविले होते.
पथकाने सदर ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे सातपुर परिसरात सापळा लावुन एक्टीव्हा गाडी व त्यावरील १) पंकज विनोद आहेर (वय २५, रा-महाकाली चौक, सिडको नाशिक), २) आशिष रामचंद्र भारद्वाज (वय २५, रा-शुभमपार्क उत्तमनगर, सिडको नाशिक) यांना ताब्यात घेवून त्यांना वरील गुन्हयाचे बाबत विचारपुस केली असता त्यांनी व त्यांचे साथीदार अशांनी मिळून चेतन आनंदा ठमके यास लोखंडी कोय-याने मारहाण करून जखमी करून त्यास जिवे ठार मारले आहे बाबत कबुली दिल्यावरून नाशिकरोड पोलिस स्टेशन गुरनं ९१ / २०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी यांच्या ताब्यातुन गुन्हयात वापरलेली एक्टीव्हा गाडी व गुन्हयातील लोखंडी कोयता असा एकुण ५०, ५००/-रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईकामी नाशिकरोड पोलिस ठाणे यांचेकडे हजर करण्यात आले आहे. गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध गुन्हेशाखा युनिट क १ हे घेत आहे.
सदर कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोनि विजय पगारे, सपोनि/ हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, सपोउनि / सुगन साबरे, रविंद्र बागुल, पोहवा/देविदास ठाकरे, महेश साळुंके, विशाल काठे, प्रविण वाघमारे, धनंजय शिंदे, पोना/ मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे, पोअं/मुक्तार शेख, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, चासपोउनि/किरण शिरसाठ यांनी केली आहे.
नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…
नाशिक शहरात घरफोड्या करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…
नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यात युनिट १ला यश…
नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

