
नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यात युनिट १ला यश…
नाशिक: नाशिक शहरामध्ये होत असलेल्या चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यास गुन्हे शाखा, युनिट क्रमांक १ला यश आले आहे. विधीसंघर्षित बालकांकडून चैन स्नेचिंगचे ०६ गुन्हे उघड केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त गुन्हे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने आडगाव पोलिस ठाणे कडीला गुरनं २९२ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे ०५/१०/२०२३ रोजी दाखल झाला होता. त्यावेळी गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या घटनास्थळाचे आजू बाजूचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले होते. सदर सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये जबरीने चैन खेचनारे दोन संशयित दुचाकीवर दिसूत आले होते. गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार सदर संशयिताची ओळख पटवून त्यांचा शोध घेत होते.
सदर शोध घेत असताना, गुन्हे शाखा युनिट १ चे प्रशांत मरकड यांनी गुप्त बातमी दारामार्फत सदर आरोपींची ओळख पटली. आरोपी सिडको अंबड परिसरात राहत असल्याची माहिती मिळविली. सदरची माहिती वपोनिरी/ विजय ढमाळ यांना दिली त्यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करून संशयीत इसमास ताब्यात घेणे कामी गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील सपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / ९००भांड, पोहवा / ३६७ म्हसदे, पोहवा / १८८३ काठे, पोहवा / १०९ वाघमारे, पोहवा/१३१६ पठाण, पोना / ३७७ मरकड, पोअं/ २२७३ कोष्टी अशांचे पथक पाठविले असता, नमुद पथकाने त्यांना सिडको नाशिक येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचेकडे चौकशी केली असता दोन्ही इसम विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना विचारपुस केली असता त्यांनी व्हेस्पा मोपेड तसेच होंडा मोटार सायकलचा वापर करून आडगाव तसेच म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत चैनस्नॅचिंगचे गुन्हे हे दोघांनी मिळुन केले असल्याची कबुली दिली. त्याचेकडुन खालील पोलिस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आले आहे.
१) आडगाव पोलिस ठाणे कडीला गुरनं २०९/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
२) आडगाव पोलिस ठाणे कडीला गुरनं २८२/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
३) आडगाव पोलिस ठाणे कडीला गुरनं २९२ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
४) म्हसरूळ पोलिस ठाणे कडीला गुरनं १७/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
५) म्हसरूळ पोलिस ठाणे कडीला गुरनं १३४/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
६) म्हसरूळ पोलिस ठाणे कडीला गुरनं २६९/ २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
विधीसंघर्षित बालकांनी चोरी केलेला मुद्देमाल हा शिरीष गणपतराव शिरवाडकर, रा- सिडको नाशिक यास विक्री केल्याने त्यास सदर गुन्हयात आरोपी करून त्यांचेकडुन वरील ६ गुन्हयातील चैनस्नॅचिंग गुन्हयातील चोरीस गेलेला माल व गुन्हयात वापरलेली मोपेड व मोटार सायकल असा एकुण ६,७०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित गुन्हयात ताब्यात घेण्यात आलेल्या विधीसंघर्षित बालक यांना त्यांच्या पालकांसमवेत प्रधान बाल न्यायमंडळ,उंटवाडी नाशिक येथे हजर करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि / चेतन श्रीवंत, गुन्हेशाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर, डॉ. सिताराम कोल्हे सहा. पोलिस आयुक्त गुन्हे शाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, सपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / संदिप भांड, शरद सोनवणे, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, नझीमखान पठाण, पोना / ३७७ प्रशांत मरकड, पोअं / अमोल कोष्टी, मपोअं / अनुजा येलवे यांनी केली आहे.
नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड; घबाड हाती…
नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ : संदिप कर्णिक
नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद…
नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; उच्च शिक्षित ताब्यात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

