यवतमाळ जिल्ह्यातील PI, API पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणूका…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक (PI) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) यांच्या बदल्या व नेमणूका करण्यात आल्या आहे.

यवतमाळ जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलिस कायदा – 1951 मधील कलम 22 (न) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील नमुद पोलिस अधिकारी, त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आल्याप्रमाणे प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या व नेमणूका करण्यात आल्या आहेत. सदरच्या बदल्या व नेमणूका यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड (SUPERINTENDENT OF POLICE DR. PAVAN BANSOD) यांनी केल्या आहे.

पोलिस निरीक्षक प्रशांत जानराव कावरे पोलिस स्टेशन सायबर क्राईम यवतमाळ वरुन ग्रामीण पोलिस स्टेशन यवतमाळ, पोलिस निरीक्षक नंदकिशोर मनोहरराव पंत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यवतमाळ वरुन पोलिस स्टेशन वसंतनगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बापुराव नरसाळे पोलिस स्टेशन पांढरकवडा वरुन पोलिस स्टेशन पारवा व सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास आत्माराम पाटील पोलिस स्टेशन वसंतनगर वरुन पोलिस स्टेशन खंडाळा येथे नेमणूक करण्यात आली आहे. बदली व नेमणूका झालेले पोलिस निरीक्षक (POLICE INSPECTOR) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (ASSISTANT POLICE INSPECTOR) यांना नेमणूकीचे ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड (SUPERINTENDENT OF POLICE DR. PAVAN BANSOD) यांनी दिले आहे. आदेशाच्या प्रति अपर पोलिस अधीक्षक यवतमाळ, पोलिस अधीक्षक (मुख्यालय) यवतमाळ, उप विभागीय पोलिस अधिकारी यवतमाळ, उप विभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा, उप विभागीय पोलिस अधिकारी पुसद, पोलिस नियंत्रण कक्ष व संबंधित पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती…

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!