सिंहगड रोड पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान एकाला पकडले अन्…

पुणे (संदीप कद्रे): सिंहगड रोड पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान संशयीतरित्या फिरणाऱ्या आरोपी कडून एक पिस्टल व एक जिवंत काडतुस हस्तगत केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलिस स्टेशन हाद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिहगडरोड पो स्टे पुणे व पोलिस निरीक्षक (गुन्हे), सिहगडरोड पोलिस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने १०/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन हद्दीत कोम्बींग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्ड वरील आरोपी चेक करीत असताना पोलिस अंमलदार/आबा उत्तेकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खंडोजी बंडोजी चव्हाण शाळाचे पाठीमागे, नंदीबावरा मित्र मंडळाचे जवळ, मोकळया मैदानात, धायरी पुणे येथे एक जण गावठी पिस्टल घेवुन थांबलेला आहे, अशी बातमी मिळाली होती.

सदरची बातमी सोबतचे सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी ती बातमी वरीष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक (गुन्हे) सिंहगडरोड पोलिस ठाणे, पुणे शहर यांना कळविली असता वरिष्ठांनी सदर ठिाकणी जावुन खात्री करुन पुढील योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनानुसार लागलीच सपोनि सचिन निकम यांनी सोबतच्या स्टाफाह खाजगी गाडीने निघुन खंडोजी बंडोजी चव्हाण शाळाचे पाठीमागे, नंदीबावरा मित्र मंडळाचे जवळ, मोकळया मैदानात, धायरी पुणे येथे येवून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करता एक जण दिसला त्याची व आमची नजरा नजर होताच तो त्या ठिकाणावरुन आमची नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच वरील स्टाफचे मदतीने काही अंतरावर त्यास १०/०१/२०२४ रोजी २३.१५ वा. चे सुमारास पकडले. प्रणव विनोद कुंभार (वय- १९ वर्षे धंदा-शिक्षण रा. फ्लॅट नं.१०२/१०३ राजरत्न अपार्टमेंट बेनकरवस्ती चव्हाणशाळेजवळ धायरी पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याची अंगझडती घेता त्याचे उजवे बाजुचे कंबरेस जिन्स पॅन्टच्या आत मध्ये एक ४५,०००/-रुपये किंमतीचे पिस्टल व पॅन्टचे खिश्यात ५००/- रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुसे असा एकुण ४५,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गणेश मोकाशी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, संभाजी कदम सो,मा.पोलिस उपआयुक्त परीमंडळ -३ पुणे, आप्पासाहेब शेवाळे, सहा पोलिस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे, अभय महाजन, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे, श्री जयंत राजुरकर सोो, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उप निरीक्षक श्री गणेश मोकाक्षी, पोलिस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, अमोल पाटील, अविनाश कोंडे, विकास बांदल, विकास पांडुळे, दक्ष पाटील यांचे पथकाने केली.

सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे पोलिस! साडेतीन वर्षांनतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य…

निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…

पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!