बीड हादरलं! अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला झोपेतच संपवलं अन्…

बीड: एकाने अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची झोपेतच हत्या केल्यानंतर स्वतःच्या शेतात आत्महत्या केली आहे. विष्णू गणपत कदम असे मृत पतीचे नाव आहे. पत्नीच्या हत्येनंतर अवघ्या दोन दिवसांत पतीनेही टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आनंदवाडी (ता. शिरूर) येथील विष्णू कदम (वय ६५) आणि त्याची पत्नी भिवराबाई कदम (वय ५५) यांच्यात पतीच्या अनैतिक संशयावरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून सोमवारी पहाटे घरात झोपलेल्या भिवराबाई यांच्या डोक्यात दगड घालून विष्णू याने त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत महिलेचा मुलगा सुनील विष्णू कदम याच्या फिर्यादीवरून वडील विष्णू कदम यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पत्नीच्या हत्येनंतर विष्णू कदम घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यामुळे चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सचिन इंगळे यांनी त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके नियुक्त केली होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास विष्णू कदम याने स्वतःच्या शेतातील कपाशीच्या पऱ्हाट्यांच्या ढिगाला आग लावली आणि त्यात उडी घेतली. या घटनेत गंभीर भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या संशयित पतीचाही मृत्यू झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या घटनेचा पुढील तपास चकलांबा पोलिस करीत आहेत.

अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट, शिक्षकाकडून प्रेयसीची निर्घृण हत्या अन्…

नाशिक! डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा अनैतिक अँगल; तू तुझ्या नवऱ्याला आवडत नाही…

पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…

अनैतिक संबंधाचा संशय अन् आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस काय म्हणत…

सावत्र आई अन् मुलाच्या अनैतिक संबंधांचा झाला थरारक शेवट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!