
पुणे जिल्ह्यात पोटच्या मुलीवर बलात्कार अन् गरोदर; बापाला जन्माची अद्दल…
पुणे : पुणे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधम बापानं आपल्या पोटच्या लेकीवर अत्याचार केले आणि ती गरोदर असल्याचे समजताच बाप तिला सोडून पसार झाला. याप्रकरणी बापाला जन्माची अद्दल घडली आहे. कोर्टाने आता आरोपीला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी बाप २०२२ मध्ये आपल्या मुलीसह वीटभट्टीवर काम करत होता. २७ डिसेंबर २०२२ पासून त्याने मुलीवर अत्याचार केले. मुलगी गरोदर राहिल्याचे समजताच आरोपी बाप तिला सोडून पसार झाला होता. भट्टी मालकाच्या पत्नीने नातेवाईकांशी संपर्क साधून याबद्दल माहिती दिली. यानंतर सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली आणि दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
View this post on Instagram
पोटच्या मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी दोषी बापाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला. यासोबतच पीडितेला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
सातारा! शिक्षक असलेल्या बापाने मुलीला संपवलं अन् AI ला विचारलं…
युवतीला बाप-चुलत्याने हालहाल करून मारलं; पुण्यात संपवलं अन् सातारा…
बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत टाकले अन् घेतला गळफास…
मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून टोमणे अन् बापाने घेतला चिमुकल्याचा जीव…
हृदयद्रावक! बापाने तीन दिवसांच्या लेकीचा घेतला जीव…

