
पुणे! पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात; शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल अन् निलंबीत…
पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या एका पोलिस अंमलदाराला अडवणे एका निष्पाप कार चालकाला भलतेच महाग पडले आहे. संतापलेल्या पोलिसाने मध्यस्थी करणाऱ्या चालकाच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार केल्यानंतर तो चालक जागीच बेशुद्ध होऊन थेट कोमात गेला होता. तब्बल अडीच महिन्यांच्या उपचारांनंतर तो शुद्धीवर आला आणि त्याने दिलेल्या जबाबावरून पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली.
पुणे पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस अंमलदार अमित सुरेश जाधव (वय ४२, रा. भवानी पेठ) याच्या कुटुंबाला (पत्नी, आई, बहीण आणि दोन मुलं) चालक शुभम चंद्रकांत भोसले (वय २७) ३१ मे २०२६ रोजी कारने देवदर्शनाला घेऊन गेला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास करमाळा एसटी बसस्थानकाजवळ चहा-नाश्त्यासाठी ते सगळे थांबले. याचवेळी आरोपी अमित जाधव तिथे आला आणि कुटुंबाला शिवीगाळ करत पत्नीला मारहाण करू लागला होता. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी चालक शुभम भोसले पुढे गेला. मात्र, संतापलेल्या अमित जाधव याने शुभमला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जवळच पडलेल्या झाडाच्या जाड काठीने त्याच्या डोक्यावर वार केले. डोक्यातून प्रचंड रक्तस्राव झाल्याने शुभम जागीच कोसळला आणि बेशुद्ध झाला.
View this post on Instagram
शुभमला गंभीर अवस्थेत पुण्यात आणण्यात आले. सुरुवातीला ४१ दिवस उपचार घेतल्यानंतर ११ जुलै रोजी त्याला घरी सोडण्यात आले. परंतु प्रकृती बिघडल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले गेले. अखेर अडीच महिन्यांनंतर शुभम हळूहळू शुद्धीवर आला.
कोरेगाव पार्क पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी शुभमचा जबाब नोंदवून तो करमाळा पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी अमित जाधव याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत २२ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी पोलिस अंमलदार अमित जाधव याला तातडीने निलंबित केले आहे.
पुणे पोलिस दलात खळबळ! वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल…
कुख्यात गुंड गजा मारणेची ‘मटण पार्टी’ पडली महागात; पोलिस निलंबीत…
पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
महिला IPS अधिकाऱ्यावर पोलिसांनीच ठेवली ‘नजर’; सात पोलिस निलंबीत….
पुणे! ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस? एक्स बॉयफ्रेंडवर कोयत्यानं हल्ला…

