जळगाव! ट्रॅक्टर मालकासह चौघांनी शेतात केला सामूहिक अत्याचार…

जळगाव : शेतीसाठी भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरचे पैसे वेळेवर न चुकवल्याने एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फत्तेपूर गावात घडली आहे. आरोपींनी पीडित महिलेला एकटीला गाठून हा लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित विवाहित महिलेने (वय ३०) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टरच्या मालकासह इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पीडित महिलेच्या पतीने काही महिन्यांपूर्वी शेतीकामासाठी एका ओळखीच्या व्यक्तीकडून भाड्याने ट्रॅक्टर घेतला होता. ट्रॅक्टर घेतल्यापासून त्याने भाडं दिलं नव्हते. काही आठवड्यांपूर्वी ट्रॅक्टर मालकाने भाड्याचे एकूण १ लाख रुपये थकीत असल्याचे सांगत ते तातडीने देण्याची मागणी केली. मात्र, आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने पतीला हे पैसे तत्काळ देणं शक्य झाले नाही. पैसे न मिळाल्याने संतापलेला ट्रॅक्टर मालक काही दिवसांपूर्वी पीडितेच्या शेतात आला. त्या वेळी तिचा पती शेतात नव्हता. आरोपीने पीडित महिलेला खाण्यासाठी काहीतरी खाद्यपदार्थ दिले. ते खाल्ल्यानंतर महिलेला चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागले. तिला अर्धवट गुंगी आली. महिलेची ही अवस्था पाहून ट्रॅक्टर मालकाने त्याच्या अन्य तीन साथीदारांना फोन करून शेतात बोलावून घेतले. त्यानंतर या चारही जणांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केला.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र, अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला पोलिसांत न जाण्यासाठी आणि तोंड बंद ठेवण्यासाठी गंभीर परिणामांची व जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपींच्या भीतीने घाबरलेल्या पीडितेने सुरुवातीला पोलिसांकडे धाव घेतली नाही. अखेर धाडस करून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील चारही आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुणे! आळंदी परिसरात घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार…

राजधानी हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर 2 तास सामूहिक अत्याचार; अंगावर काटा…

महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार…

सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…

महाराष्ट्र हादरला! कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, सामूहिक अत्याचार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!