
पुणे! शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणूक करणारा जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणुक करुन ३ वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे.
गुंतवणुकदारांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतुन चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादी व इतर ८९, सहकारी यांची माहे सप्टेंबर २०२१ ते ३१/१०/२०२३ या कालावधीमधे ३,३९,१२,६३७/- रुपयांची आर्थिक फसवणूक केलेल्या गुन्हयातील आरोपी भारत सोपान पठारे हा नाशिक भागात असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने त्यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाथर्डी फाटा, नाशिक येथून ताब्यात घेऊन चंदननगर पो. स्टे. गु. र. नं. ५१४/२०२३, भा. द. वि. १२० (ब), ४०६, ४१९, ४२०, ४०९ सह MPID (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९) चे कलम ३ व ४ या गुन्हयामध्ये १९/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांची फसवणूक करुन मागील ३ वर्षांपासून फरार होता.

आरोपी भारत सोपान पठारे (वय ३०, रा. नाऊरगाव ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर) व त्यांच्या सहकाऱ्यांनी एफ. ट्रेड सेल्स एजन्सी प्रा. लि. या कंपनीचे बोरीवली
मुंबई व खराडी (पुणे) येथे ऑफिस तयार करुन आलेल्या नागरीकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करुन जास्त परतावा मिळून देण्याचे आमिष दाखवुन, प्रथम थोडया प्रमाणात परतावा देवुन, त्यानंतर गुंतवणुकदारांची फसवणुक करुन पैशांचा अपहार करुन गुंतवणुकदारांचे ३,३९,१२,६३७/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजन कुमार, पोलिस सह आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, सोमय मुंडे, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ७, पुणे शहर प्रांजली सोनवणे, सहा. पोलिस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली निलेश बडाख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस स्टेशन, पुणे शहर, सहा पोलिस निरीक्षक श्री. सचिन साळवे, पोहवा २५५३ गुरव, पोहवा ६३११ घावटे, पोहवा ४३१ घाडगे, पो. अंमलदार २७४४ बेंद्रे यांनी केली आहे.
भिगवणच्या युवतीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहा…
पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
पुणे! पोलिस आयुक्त कारवाईचा आढावा घेण्यासाठी स्वतः उतरले रस्त्यावर…
पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…

