
नगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच दिवस जंगलात लैंगिक अत्याचार…
अहिल्यानगर: राहुरी तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाला आता ‘लव्ह जिहाद’चा अँगल जोडला जात असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. राहुरी पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित मुलगी १३ फेब्रुवारी रोजी ‘कॉलेजला जाते’ असं सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, सायंकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. चिंताग्रस्त पालकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी तातडीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मुलीचे अपहरण झाल्याचं लक्षात येताच पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, पीडितेला नाशिक-सुरत रोडलगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरातील घनदाट जंगलात नेण्यात आले आहे. पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवून अत्यंत कौशल्याने मुलीची सुटका केली. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच दिवसांपासून तिला या ठिकाणी डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते.
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुक्तार हैदर पठाण (मुख्य आरोपी), कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे यांचा समावेश आहे. मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पीडितेच्या जबाबानुसार, पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…
पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…
सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…
Valentine Day ला शिक्षकाने विद्यार्थिनीला बाहेर बोलवलं अन्…

